• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • भाजप-सेनेच्या 'युती वादा'वर काँग्रेस भाजणार पोळी, आजच्या बैठकीत मोठा निर्णय

भाजप-सेनेच्या 'युती वादा'वर काँग्रेस भाजणार पोळी, आजच्या बैठकीत मोठा निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे या बैठकीसाठी उपस्थित नव्हते. तर या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी 50 जागांवर उमेदवारांची नावं फायनल करण्यात आली आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुत्तेमवार यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शनिवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी 60 जागांवर उमेदवारांच्य़ा नावाची चर्चा करण्यात आली असून 50 जागांवर उमेदवारांची नावं फायनल झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या सर्व राजकीय पक्ष हे विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. त्यात आता काँग्रेसनंही विधानसभेचं जोरदार प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भाजप-शिवसेनेमध्ये युतीवरून वाद सुरू आहे. विधानसभेसाठी युतीचा 50-50 फॉर्म्युला अमान्य आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत संभाव्य वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे या बैठकीसाठी उपस्थित नव्हते. तर या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी 50 जागांवर उमेदवारांची नावं फायनल करण्यात आली आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुत्तेमवार यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर यावेळी काँग्रेस मोठ्या चेहऱ्यांना मैदानात उतरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर विद्यामान आमदारांना विधानसभेत संधी मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, 17 सप्टेंबरला महाराष्ट्र स्क्रीनिंग कमिटीची बैठक पार पडणार आहे. 18 सप्टेंबरला महाराष्ट्रातील निवडणुकांचं प्लॅनिंग करण्यासाठी आणखी एक बैठक पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. इतर बातम्या - BREAKING VIDEO: बारामतीत राडा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्यांनी थांबवलं समितीने ज्या नावांवर चर्चा केली आहे. ते उमेदवार 90% फायनल आहेत तर काही जागांवर फेरविचार केला जाईल. 18 सप्टेंबरला काँग्रेसच्या सीईसी (central election committee)ची बैठक होणार आहे. तर जेव्हा भाजप-शिवसेनेच्या जागा आणि उमेदवार पाहिल्यानंतर आम्ही आपलं धोरण आखून उमेदवारी घोषित करू असंही खरगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीने 125-125 जागा निश्चित केल्या आहेत. उर्वरित जागा आघाडीतील इतर घटक पक्षांशी बोलून ठरतील अशी माहिती खरगे यांनी दिली. इतर बातम्या - उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...! 'मुख्यमंत्री आणि उद्धवजींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला' गेल्या काही दिवसांपासून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जेपी नड्ड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेसुद्धा उपस्थित होते. या उदयनराजेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या मेगाभरतीची खिल्ली उडवली आहे. इतर बातम्या - साता जन्माचं वचन दिलेल्या पतीची निर्घृण हत्या, पोलिसांना फोनवर पत्नी म्हणते...! आतापर्यंत राष्ट्रवादीच्या जितक्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला तो पाहता दोन्ही पक्षांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला असं अप्रत्यक्षपणे आव्हाड यांनी म्हटलं आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, तिथं नव्यांची संख्याच जास्त दिसायला लागली आहे. याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी ट्विटरवरून खोचक टोमणा मारला आहे. इतर बातम्या - मेगाभरतीनंतर आता भाजपचा मास्टर प्लॅन, युतीचं घोडं अडलेलं असताना नवा प्रचार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, मुख्यमंत्री आणि उध्दवजी केबिन मध्ये बोलत बसले होते अचानक झंम्प्या तिथे कुतुहलाने बघायला गेला तिथे उदयनराजे भोसले,भास्कर जाधव, गणेश नाईक, निंबाळकर, सचिन अहिर आणि इतरांना बघून तो ओरडत बाहेर आला, मुख्यमंत्री आणि उध्दवजीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. श्रीनगरमध्ये तिरंगा फडकला, बारामतीतलं मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण
  Published by:Renuka Dhaybar
  First published: