मुंबई 17 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर भाजप काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशात आता भाजपने आपला उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवत नसल्याचं भाजपने सांगितलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबत माहिती दिली.
...म्हणून अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाने उमेदवार दिला नाही, उदय सामंतांनी सांगितलं कारण
भाजप अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याने आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणखी १३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र ऋतुजा लटके यांच्यासमोर मोठं आव्हान असलेले भाजपचे उमेदवार मुरजी हे या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दुपारी 3 वाजेपर्यंत इतर उमेदवारांनीही माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
काल मुख्यमंत्र्यांची भेट, आज फडणवीसांना पत्र, नंतर राज ठाकरे म्हणतात, 'सगळीकडे ओरबाडणं सुरुय'
अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. अशात आता मुरजी पटेल यांनीही माघार घेतली असल्याने ऋतुजा पटेल बिनविरोध निवडणूक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andheri East Bypoll, BJP, Shivsena