मुंबई, 17 डिसेंबर : आज महाविकास आघाडीच्या वतीनं महापुरुषांच्या बदनामीविरोधात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. तसेच राज्यपालांच्या वक्तव्याचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर हा दुसरा सर्वात मोठा लढा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची वेळ आली असल्याचा घणाघातही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? महाविकास आघाडीच्या मोर्चामधून उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकार आणि राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची वेळ आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरचा हा सर्वात मोठा लढा आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड होऊ देणार नाही, जोपर्यंत बेळगाव महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी राज्यापालांना देखील टोला लगावला आहे. हेही वाचा : फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा! राज्यपालांवर हल्लाबोल मी भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल मानत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्या पदावर कोणालाही बसाव आणि त्याने टपल्या माराव्यात हे चालणार नाही. राज्यपालांना हटवण्यासाठीच हा मोर्चा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : हल्लाबोल महामोर्चा; मविआच्या कार्यकर्त्यांसोबत रश्मी ठाकरे सुद्धा उतरल्या रस्त्यावर महामोर्चातून शक्तिप्रदर्शन! आज महाविकास आघाडीच्या वतीनं विराट अशा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चाला महाविकास आघाडीमधील जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. अधिवेशनापूर्वी विरोधकांकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







