मुंबई, 14 डिसेंबर : एकीकडे आज महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेश हिवाळी अधिवेशनाला 19 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन आठवडे हे अधिवेश चालणार असून, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विविध विषयांवरून विरोधक सकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आजची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे. हेही वाचा : सोमय्या, दरेकरांनंतर आता प्रसाद लाड यांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणाचा तपास बंद अधिवेशनात ‘हे’ मुद्दे तापणार? यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. महापुरुषांबाबत सुरू असलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे. हाच मुद्दा अधिवेशनात देखील सर्वाधिक तापण्याची शक्यता आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना मिळणारी मदत, ईडी कारवाई, मंत्रिमंडळ विस्तार यावरून देखील विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.