जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हल्लाबोल महामोर्चा; मविआच्या कार्यकर्त्यांसोबत रश्मी ठाकरे सुद्धा उतरल्या रस्त्यावर

हल्लाबोल महामोर्चा; मविआच्या कार्यकर्त्यांसोबत रश्मी ठाकरे सुद्धा उतरल्या रस्त्यावर

रश्मी ठाकरे

रश्मी ठाकरे

आज महाविकास आघाडीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात रश्मी ठाकरे देखील सहभागी झाल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 डिसेंबर : आज महाविकास आघाडीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या महामोर्चाला भायखळ्यापासून सुरुवात झाली. या महामोर्चात महाविकास आघाडीचे जवळपास सर्वच प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ, काँग्रेसचे नेते नाना पटोल आणि उद्धव ठाकरे हे या मोर्चात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. विराट महामोर्चा  आज महाविकास आघाडीच्या वतीनं वारंवार होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी मुंबईमध्ये विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा होणार आहे. सभास्थळी महाविकास आघाडीचे नेते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या महामोर्चात उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटंबच सहभागी झालं आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. अधिवेशनापूर्वी विरोधकांचं शक्तिप्रदर्शन!   आज महाविकास आघाडीच्या वतीनं विराट अशा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.  या महामोर्चाला महाविकास आघाडीमधील जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. अधिवेशनापूर्वी विरोधकांकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचं दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात