मातोश्रीवर शरद पवारांसोबत झाली गुप्त बैठक, महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप?

मातोश्रीवर शरद पवारांसोबत झाली गुप्त बैठक, महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप?

सत्तास्थापनेच्या कठोर वेळीसुद्धा शरद पवारांनी कधी मातोश्रीची पायरी चढली नव्हती, तेदेखील या बैठकीसाठी उपस्थित होते.

  • Share this:

मुंबई, 26 मे : देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले असताना राज्यात राजकीय वातावरण देखील तितकंच तापलं आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला कारणंही तसंच आहे. महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या तिन्ही पक्षांना एकत्र आणणारे संजय राऊत यांच्या मातोश्रीवर गुप्त बैठक पार पडली.

काल संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची महत्वाची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, बैठकीत फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील आणि केंद्रातील महत्वाच्या राजकिय घडामोडींवर चर्चा झाल्याचं समजतं आहे.

महाराष्ट्रातील सतत वाढती कोरोनाग्रस्तं रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार आपतकालिन परिस्थिती कायद्यांतर्गत ICMR म्हणजेच इंडियन काउन्सील आँफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या हाती सर्व सूत्रं देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही दिल्लीत बरीच उठाठेव केल्याचीही माहीती हाती लागली आहे. कारण गेली 3 ते 4 दिवस लागोपाठ मोठे नेते राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची सातत्याने भेट घेत आहेत. या भेटींमागे मोठं राजकारण होत असल्याचीही माहीती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात महासंकट, राज्याची तुलना देशाशी केली असता धक्कादायक आकडेवारी समोर

राजकिय घटनाक्रम

1) शनिवार दिनाक 23मे - सकाळी शिवसेना नेते संजय राऊत अचानक राजभवनवर राज्यपालांना भेटण्यासाठी दाखल.

2) शनिवार दिनांक 23 मे - दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्माराकात बैठक.

3) सोमवार 25 मे सकाळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजभवनवर राज्यपालांना भेटण्यासाठी दाखल.

4)सोमवार 25 मे सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटाला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राजभवनात घेतली राज्यपालांची भेट

5) सोमवार दिनांक 25 मे संध्याकाळी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची गुप्त बैठक

मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, अभिनेते गिरीश साळवी यांचे निधन

खरंतर, राज्यात ऐतिहासिक सत्ता बदल झाला आहे. तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत संसार सुरू केला आहे. या सगळ्या मोठ्या आणि सत्तास्थापनेच्या कठोर वेळीसुद्धा शरद पवारांनी कधी मातोश्रीची पायरी चढली नव्हती, तेदेखील या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचंही समजतं आहे. येत्या गुरुवारी महाविकास आघाडीला 6 महिने पूर्ण होतायत त्याआधीच या सरकारवर सत्ता जाण्याचे ढग दाटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 26, 2020, 8:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading