पंकजांबाबतच्या या गोष्टीचा बसला आश्चर्याचा धक्का - धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सांगितली 'मन की बात'

पंकजांबाबतच्या या गोष्टीचा बसला आश्चर्याचा धक्का - धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सांगितली 'मन की बात'

Coronavirus च्या पार्श्वभूमीवर विधानसपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा फारशी झाली नाही. पण पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी त्यावर भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : Coronavirus च्या पार्श्वभूमीवर विधानसपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा फारशी झाली नाही. पण भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतूनही आमदारकी नाकारली तेव्हा त्याबद्दल मात्र बातम्या झाल्या. पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली त्यावर त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्ट्रवादीचे नेते, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया प्रथमच समोर आली आहे.

लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी ही मन की बात बोलून दाखवली. 'पंकजाताईंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणं स्वाभाविक होतं.ती का मिळाली नाही, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला, तरी मला या गोष्टीमुळे आश्चर्याचा धक्का बसला', असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

भाजपने कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, असं सांगताना धनंजय मुंडे म्हणाले, "जेव्हा कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाचा नेता निवडणुकीत पराभूत होतो. त्यावेळी त्याच्या नेतेपदाला पाठिंबा देण्यासाठी राज्यसभा, विधानपरिषदेतून त्याला प्रतिनिधित्व दिलं जातं. हे स्वाभाविक राजकारण आहे. पंकजाताईंबद्दलही त्यांना विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उमेदवारी मिळणं स्वाभाविक होतं. त्यांचं तिकिट कापलं तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं. आश्चर्याचा धक्का बसला."

'निसर्ग'नंतर राजकीय चक्रीवादळ, सरकारच्या पॅकेजमध्ये फडणवीसांनी काढल्या चुका

मागच्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यानी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. परळीची ही निवडणूक मुंडे भावंडांच्या लढाईमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर भाजप आणि विरोधी पक्षांमध्येही नेमकं काय राजकारण शिजलं याविषयी चर्चेचे फड रंगले होते.

अन्य बातम्या

बापरे! खासगी ‘लॅब’ने केली चुकीची COVID-19 टेस्ट, 35 जणांचा जीव घातला धोक्यात

महिलेनं बनवला असा HOT TEA; व्हिडीओ पाहून लोकांचं डोकं तापलं ना राव!

First published: June 11, 2020, 8:16 PM IST

ताज्या बातम्या