मुंबई, 11 जून : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या रेसिपींचे व्हिडीओच व्हायरल होत आहेत. काही जण तर इतक्या विचित्र रेसिपी बनवत आहेत की आपण त्याची कल्पनाही केली नसेल. नुकताच एका अमेरिकेन महिलेचा चहा बनवण्याचा (Tea Recipe) व्हिडीओ सोशल मीडियीवर व्हायरल होतो आहे. ज्यामुळे हा हॉट टीचा व्हिडीओ पाहून लोकांचा डोक्याचा संताप उडाला आहे. अमेरिकन महिलेनं ब्रिटिश चहा (British Tea) कसा बनवायचा याचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. टिकटॉक (TikTok Viral Video) आणि ट्विटरवरही (tweeter) हा व्हिडीओ आहे.
@jchelle36 Americans making hot tea 🍵 ##americanintheuk @mleemaster10 ♬ original sound - jchelle36
ही महिला एका नळातील पाणी कपात घेते. त्यानंतर एक मिनिट मायक्रोव्हेवमध्ये गरम करेत. यानंतर या महिलेची मुलगी हा कप दुधाने भरते. ज्यामध्ये ती साखर टाकते आणि टी बॅग टाकते. महिलेनं सांगितलं, “हा चहा थोडा ढवळून घ्या आणि आता तुम्ही चहा तयार झाला”
व्हिडीओ पोस्ट करताना या महिलेनं कॅप्शन लिहिलं आहे की, मी ब्रिटिश चहा बनवावा असं प्रत्येकाला वाटत होतं, पाहा तयार झाला" हा महिलेचा ही चहा रेसिपी पाहताच लोकांनी अक्षरश: हात टेकलेत. अशा विचित्र रेसिपीवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्यात.
I literally had no idea you could make tea so wrong
— Adam (Speedy) (@Speedy_Edits) June 9, 2020
This crime needs reporting. @tetleyuk
— Shugmeister (@weeshooey) June 8, 2020
टिकटॉकवर या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्युज, लाखो लाइक्स आणि हजारो कमेंट्स आलेत. ट्विटरवदेखील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिथं हजारो लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा OMG! विमानावर कोसळली वीज आणि… अंगावर काटा आणणारा VIDEO इंग्लिश स्पीकिंग क्लासचे भन्नाट पोस्टर वाचून आवरणार नाही हसू, PHOTOS VIRAL

)







