बापरे! खासगी ‘लॅब’ने केली चुकीची COVID-19 टेस्ट, 35 जणांचा जीव घातला धोक्यात

बापरे! खासगी ‘लॅब’ने केली चुकीची COVID-19 टेस्ट, 35 जणांचा जीव घातला धोक्यात

त्या सगळ्यांचे सॅम्पल्स जेव्हा National Institute of Virology ला पाठविण्यात आले ते सगळे निगेटिव्ह आले आहेत. पण तोपर्यंत त्या सगळ्यांना तीन दिवस कॉरंन्टाइन सेंटरला ठेवण्यात आलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 11 जून: देशात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. या रुग्णवाढीचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. त्यामुळे देशभरात कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब्सना परवानगी देण्यात आली. मात्र या लॅब्सचा लुटारूपणा उघड होत आहे. दिल्ली जवळच्या नोएडामध्ये तर एका खासगी लॅबने 35 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला. मात्र ते सर्व जण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. मात्र तोपर्यंत त्या सगळ्यांना तीन दिवस कॉरंन्टाइन सेंटरमध्ये काढावे लागले. NDTVने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या सर्व जणांना ताप, थंडी, कफ, सर्दी अशी लक्षणे होती. ते सर्व जण खासगी डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी त्या सगळ्यांना कोविड-19ची चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या सगळ्यांनी चाचणी केली ती पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं.

त्या सगळ्यांचे सॅम्पल्स जेव्हा National Institute of Virology ला पाठविण्यात आले ते सगळे निगेटिव्ह आले आहेत. पण तोपर्यंत त्या सगळ्यांना तीन दिवस कॉरंन्टाइन सेंटरला ठेवण्यात आलं होतं. आणि मानसिक त्रास झाला तो वेगळाच.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या संबंधित लॅब विरुद्ध FIR नोंदविण्यात आला असून अन्य सहा लॅब्सला नोटीस पाठवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

COVID-19: मुंबईतील 11 लाख घरं सील, 50 लाख लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 9996 नवीन रुग्ण आढळून आले. यासह कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 86 हजार 579 झाला आहे. तर, दुसरीकडे आत मृतांचा आकड्यात सर्वात जास्त वाढ झाली. गेल्या 24 तासांत तब्बल 357 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्यावर गेला आहे. ही चिंतेची बाब असली तरी एक दिलासादायक बातमीही आली आहे.

 हे वाचा -

कोरोनाची भीती: थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग, मारहाणीत झाला ड्रायव्हरचा मृत्यू

मुंबईत मान्सूनचा पहिला बळी? खेळता खेळता नाल्यात पडला 5 वर्षांचा चिमुरडा

 

 

 

 

First published: June 11, 2020, 7:34 PM IST

ताज्या बातम्या