'निसर्ग'नंतर उफाळलं राजकीय चक्रीवादळ, राज्य सरकारच्या पॅकेजमध्ये फडणवीसांनी काढल्या या चुका

'निसर्ग'नंतर उफाळलं राजकीय चक्रीवादळ, राज्य सरकारच्या पॅकेजमध्ये फडणवीसांनी काढल्या या चुका

राज्य सरकारने कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

  • Share this:

श्रीवर्धन, 11 जून : 'पहिल्या दिवशी आज कोकणातील जनतेशी संवाद साधल्यानंतर एक बाब स्पष्ट झाली की, वादळ येऊन 9 दिवस झाले. पण, कोकणात राज्य सरकारची कोणतीही मदत अद्याप पोहोचलेली नाही. राज्य सरकारने कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत' असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

दोन दिवसांच्या आपल्या कोकण दौर्‍याच्या पहिल्या दिवसाच्या पाहणीनंतर श्रीवर्धन इथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाची प्रचंड मोठी हानी झाली आहे. वादळ येऊन 9 दिवस झाले. पण, राज्य सरकारची कोणतीही मदत लोकांना मिळालेली नाही, हे लोकांशी चर्चा केल्यानंतर प्रकर्षानं लक्षात आलं. ज्यांची घरं गेली आणि तात्पुरत्या शिबिरामध्ये राहतात, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांना योग्य ठिकाणी निवार्‍याची सोय करून त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था तातडीने करण्याची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बस आगारमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळात लोक दाटीवाटीने ठेवले आहेत, ती स्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे. त्यांची अवस्था खुराड्यासारखी झाली आहे. प्रशासन निश्चितपणे प्रयत्न करीत असेल. पण, त्याचा परिणाम होताना दिसत नाही. कुणाला मदत मिळते आहे, असं मला या दौर्‍यात दिसून आलं नाही. शासन आणि प्रशासनानं अधिक वेगानं काम करण्याची गरज आहे.

VIDEO: मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत. शेती, फळबागांचं नुकसान झालं तर पुढच्यावर्षी ते भरून निघत असतं. पण, इथे तर झाडंच राहिली नाही. नव्याने उत्पन्न सुरू होण्यासाठी किमान पुढचे 5 ते 10 वर्ष लागतील, अशी स्थिती आहे. अशात केवळ हेक्टरी मदत जाहीर करून भागणार नाही. कोकणात अल्पभूधारक मोठ्या संख्येनं असल्यानं 10 हजाराच्या वर कुणाला मदत मिळणार नाही. अशात थेट आर्थिक मदत देण्याची आज नितांत गरज आहे.

100 टक्के अनुदानातून फळबाग योजनेचा लाभ दिला पाहिजे. मासेमारांचे तर फार मोठे नुकसान झाले आहे. मासेमारांसंदर्भात अजून कोणतीही मदत जाहीर नाही. होड्यांसाठी त्यांना तत्काळ मदत देण्याची गरज आहे. त्यांच्यावर कर्ज आहे. ते दुष्टचक्रात अडकले आहेत. घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना टिन, सिमेंट पत्रे हवे आहेत. पण, त्याचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे शासनाने यात मध्यस्थी करण्याची गरज आहे. वीज व्यवस्था सुरळीत होईल, याची तातडीने काळजी घेण्याची गरज आहे. अंधार तर आहेच, शिवाय पाणीपुरवठा योजना बंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मुंबईत भयंकर प्रकार, कोरोना रुग्णाचा मृतदेह उघडून मारली मिठी आणि नंतर...

गेल्यावर्षी कोल्हापूर-सांगली पुराच्यावेळी कपडे आणि भांड्यासाठी प्रत्येकी 7500 रूपये देण्यात आले होते. तात्पुरत्या निवार्‍यासाठी 36 हजार आणि 24 हजार असे एकरकमी भाडे देण्याचा निर्णय केला होता. ग्रामीण भागात अडीच लाख तर शहरी भागात साडेतीन लाख रूपये आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन्ही जीआर सर्वांच्या डोळ्यापुढे आहेत. मला तुलना करायची नाही. पण, ठोस निर्णय घेण्याची नितांत गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान आज पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चौल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगार, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. प्रत्यक्ष नुकसानीची त्यांनी पाहणी केली आणि स्थानिकांशी संवाद साधला. सकाळी दौर्‍याला प्रारंभ करण्यापूर्वी रेवदंडा येथे त्यांनी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली.

क्रिकेट क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी, भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रद्द

संपादन - रेणुका धायबर

First published: June 11, 2020, 7:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या