मुंबई, 24 नोव्हेंबर: महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर उद्या पुन्हा सकाळी सुप्रीम कोर्टात 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रात शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाबाबत आपण अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवारांच्या भूमिकेनंतर राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. काका पुतण्यामधील कौटुंबिक वाद समोर आला आहे. तर पुतण्याने आपल्या काकांविरोधात जाण्याचा निर्णय का घेतला याची 5 कारण समोर आली आहेत. या 5 कारणांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ज्यामुळे अजित पवारांनी काकांची साथ सोडून फडणवीसांसोबत हातमिळवणी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 1. महाविकासआघाडीकडून होणाऱ्या चर्चांमध्ये उपमुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत ठोस चर्चा होत नव्हती. बैठकांचा सिलसिला सुरू होता मात्र निर्णय घेतला जात नव्हता. शिवाय शरद पवारांना उपमुख्यमंत्रिपदासाठी पुतण्या म्हणजेच अजित पवारांऐवजी दुसऱ्या नावाचा विचार करत असल्याचीही चर्चा होती असंही सांगितलं जात आहे. वाचा- माझ्या कुटुंबाने गैरसमज करून घेऊ नये…’ राष्ट्रवादीच्या गायब आमदाराची भूमिका खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यात काही मुद्द्यांवरून वादविवाद होत होते. शरद पवार आपल्यापेक्षा अधिक सुप्रिया सुळेंना अधिक प्राधान्य देत असल्याची चर्चा होती. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या तिकीटावरूनही भावा-बहिणींमध्ये वादविवाद झाल्याची चर्चा होती. 3. लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवारला तिकीट दिलं होतं. पार्थ पवार 2 लाखांहून अधिक मतांनी हरल्यामुळे हा पराभव अजित पवारांच्या चांगला जिव्हारी लागला होता. त्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि परस्परांमध्ये मतभेद निर्माण झाले. शरद पवारांनी पार्थच्या तुलनेत रोहितला जास्त पाठिंबा दिली. त्यानंतर पवार कुटुबात धुसपूस सुरु असल्याची चर्चा कानावर येत होती. 4.अजित पवारांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत. त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली नसती तर अजित पवारांसमोर अडचणी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला का? असे सवालही उपस्थित होत आहेत. 5. 2008 रोजी छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यानंतर अजित पवार नाराज होते. 2010 रोजी आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं नाव समोर आल्यानं राजीनामा द्यावा लागला होता. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांना ते पद मिळण्याची संधी कमी मताधिक्य असल्यानं हुकली होती. वाचा-अजित पवारांच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवडमध्ये झळकली अशी पोस्टर्स अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ शनिवारी घेतल्यानंतर अद्याप त्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. दोन ते तीन दिवसांत सगळं नीट होईल असं जरी सांगत असले तरीही पुढे काय पाऊल उचललणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







