माझ्या कुटुंबाने गैरसमज करून घेऊ नये...' राष्ट्रवादीच्या गायब आमदाराने जाहीर केली भूमिका

माझ्या कुटुंबाने गैरसमज करून घेऊ नये...' राष्ट्रवादीच्या गायब आमदाराने जाहीर केली भूमिका

कळवणचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Share this:

नाशिक, 24 नोव्हेंबर : अजित पवार यांच्यासोबत बंडखोरी केलेले राष्ट्रवादीचे बहुतांश सर्व आमदार परतले आहेत. तर काही आमदारांनी व्हिडिओ जारी करत आपण पक्षासोबत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केलं आहे. कळवणचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहे, माझा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, मा.अजितदादा पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत आलो होतो. तिथे काय होणार आहे याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही. कुटुंबाने आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,' असं नितीन पवार यांनी म्हटलं आहे.

नितीन पवारांची भूमिकेवर निर्माण होणारे प्रश्न

- नितीन पवार हे जर पक्षाबरोबर असल्याचा दावा करत आहेत तर बेपत्ता का ?

- मुलगा ऋषिकेश, यानं ते बेपत्ता असल्यची तक्रार का दाखल केली ?

- कुटुंबाच्या संपर्कात का नाही ?

- जर शरद पवार साहेबांसोबत असा दावा करताय तर राष्ट्रवादी बैठकीत अनुपस्थित का?

दरम्यान, याआधीही राष्ट्रवादीच्या इतर काही आमदारांनी आपण पक्षासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्हिडिओ प्रसारित करत आपल्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे.

'मतदारसंघातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलो आहे आणि मी आताही पक्षासोबतच आहे. यापुढेही अजितदादा पवार आणि शरद पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेन,' असं राष्ट्रवादीच आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्हिडिओद्वारे सांगितलं आहे.

दुसरीकडे, अजित पवार यांच्या सोबत संपर्क सुरू आहे. सर्व आमदार आज रात्री परत येतील. आम्ही आज सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची वाट पाहत आहोत, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

First published: November 24, 2019, 2:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading