बारामती, 18 जानेवारी : राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्या बारामतीमध्ये (Baramati) भाजपचा (BJP) पार सुपडा साफ झाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून ताब्यात असलेली ग्रामपंचायत आता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.
बारामती तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने घवघवीत यश संपादन केले अजून भाजपाच्या गटाला एकही ग्रामपंचायत जिंकून आणता आली नाही. बारामती तालुक्यातील सांगवी येथील ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात होती. परंतु, तीदेखील राष्ट्रवादीच्या गटाने खेचून आणली आहे. बारामती तालुक्याचे लक्ष वेधून असलेल्या सांगवी ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर 20 वर्षांनंतर परिवर्तन झाले आहे. भाजपचा पराभव करून राष्ट्रवादीने मोठ्या ताकदीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
बीडच्या राजकारणाने पुन्हा घेतली कलाटणी, क्षीरसागर कुटुंबात काका पुतण्यावर भारी
माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांच्या गटाकडे असलेली ग्रामपंचायत आता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. वार्ड क्रमांक 1 व वार्ड क्रमांक 2 मधून सर्व उमेदवार राष्ट्रवादीने निवडून आणले असून भाजपने वार्ड क्रमांक 4 वर आपले वर्चस्व ठेऊन तिन्ही उमेदवार निवडून आणले आहेत.
राष्ट्रवादीने 15 पैकी आपले 10 उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून आणून भाजपला मोठा धक्का दिला आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची माळेगाव साखर कारखान्यात सत्ता होती. त्याला सुरुंग लावत राष्ट्रवादीने कब्जा केला आहे. तसंच, चंद्रराव तावरे यांची 20 वर्षे असलेली गावची सत्ता देखील आता हातून गेली असून, राष्ट्रवादीने सत्ता प्रस्तापित करून आपला झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवला आहे.
रावसाहेब दानवेंची मुलगी आणि जावई पराभूत, मुलगा आदित्यनेच उभे केले होते पॅनल!
तर दुसरीकडे, निंबुत ग्रामपंचायतीवर सतीश काकडे यांच्या गटाने 9 जागा तर राष्ट्रवादीच्या गटाने6 जागा जिंकल्या आहेत. बारामती तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीमधील दोन ग्रामपंचायत बिनविरोध आल्या आहेत. त्यामध्ये तालुक्यातील वाकी आणि माळेगाव खुर्द बिनविरोध आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.