रावसाहेब दानवेंची मुलगी आणि जावई पराभूत, मुलगा आदित्यनेच उभे केले होते पॅनल!

रावसाहेब दानवेंची मुलगी आणि जावई पराभूत, मुलगा आदित्यनेच उभे केले होते पॅनल!

हर्षवर्धन जाधवांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा आदित्य जाधव याने वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 18 जानेवारी : राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात काही नेत्यांनी आपले गड राखले आहे तर काही जणांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनाही दुहेरी धक्का बसला आहे. मुलगी आणि जावई हर्षवर्धन जाधव दोघेही पराभूत झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पिशोरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि जावई हर्षवर्धन जाधव नशिब आजमावत होते. हर्षवर्धन जाधव हे माजी आमदार सुद्धा राहिले आहे. परंतु, पिशोरी ग्रामस्थांनी संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांना नाकारले आहे. दोघांनाचाही दारुण पराभव झाला आहे.

उस्मानाबादचं नाव 'धाराशिव' करण्याचा वाद, भाजपनं बॅनरबाजी करून शिवसेनेला डिवचलं

मध्यंतरीच्या काळात हर्षवर्धन जाधव यांनी पत्नी संजना जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. एवढंच नाहीतर पुण्यात एका दाम्पत्याला मारहाण प्रकरणी हर्षवर्धन जाधवांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीत शिकत असलेले त्यांचा मुलगा आदित्य जाधव याने वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली होती. आदित्य याने, हे पॅनल आपल्या आई संजना जाधव यांच्याविरोधातच उभे केले होते.

धक्कादायक! पोलीस ठाण्यातूनच चालवलं जात होतं सेक्स रॅकेट, असं फुटलं बिंग

वडील हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक झाल्यानंतर आदित्यनं स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली. यानिमित्तानं स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्यानं राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे सांगत तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगत त्याने आईविरोधातच निवडणुकीचा धुरळा उडवला होता.

पण, गावकऱ्यांना जाधव कुटुंबातील गृह कलह काही आवडला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांना नापंसती देऊन घरी पाठवले आहे.

Published by: sachin Salve
First published: January 18, 2021, 4:28 PM IST

ताज्या बातम्या