मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडच्या राजकारणाने पुन्हा घेतली कलाटणी, क्षीरसागर कुटुंबात काका पुतण्यावर भारी

बीडच्या राजकारणाने पुन्हा घेतली कलाटणी, क्षीरसागर कुटुंबात काका पुतण्यावर भारी

जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत संदीप क्षीरसागर गटाचा धुव्वा उडवला आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत संदीप क्षीरसागर गटाचा धुव्वा उडवला आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत संदीप क्षीरसागर गटाचा धुव्वा उडवला आहे.

बीड, 18 जानेवारी : बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये राजकीय लढाई रंगली होती. मात्र या निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत संदीप क्षीरसागर गटाचा धुव्वा उडवला आहे.

तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांना धोबीपछाड दिला. राष्ट्रवादीने 6 जागा मिळवल्या, तर भाजपाला एकही जागा मिळवता आली नाही. 'ग्रामपंचायत निवडणूक चाचणी परीक्षा असते. या परीक्षेत जनतेने आमच्यवर विश्वास टाकला आहे. तो सार्थ ठरवू. शेवटी जनतेच्या मनात आमदार कोण आहे हे लोक ठरवतात,' असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीप क्षीरसागर यांना चिमटा काढला.

'विद्यमान आमदारांनी काहीच काम केलं नसल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते नाराज आहेत. एका वर्षात एकही विकास काम करू शकले नाहीत. लोकांना दिलेली मोठं-मोठी आश्वसन पाळली नाहीत. त्यामुळे लोकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि म्हणूनच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची कुवत या निवडणुकीत दिसून आली आहे,' अशी विखारी टीका डॉ. योगेश क्षीरसागर यांनी टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात पाहिल्यंदाच शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारत इतिहास रचला आहे. भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला असून जनतेने शिवसेनेवर व महाविकास आघाडी सरकारवर विश्वास टाकला आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,' असंही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

First published:

Tags: Beed, Gram panchayat