कोरोनामुळे उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, महत्त्वाच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलल्या

ध्याच्या स्थितीचा विचार करत महाराष्ट्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

ध्याच्या स्थितीचा विचार करत महाराष्ट्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

  • Share this:
    मुंबई, 23 जुलै : (Maharashtra Cabinet Meeting) राज्यावर सध्या कोरोना विषाणूचं संकट आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीचा विचार करत महाराष्ट्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अशात सरकारने राज्यात होऊ घातलेल्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक 3 महिन्यांकरिता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 3 महिने पुढे ढकलल्या निवडणुका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष आणि उपमहापौरपदाची निवडणूक आणखी 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सध्या कोरोनामुळे मोठं संकट ओढावलं आहे. अशात निवडणुकांची तयारी आणि त्यासाठी लागणारा वेळ देता येणार नसल्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर, नगरपालिका नियमानुसार 1 मेपूर्वी निवडणुका व्हायला हव्या होत्या, पण कोरोनामुळे त्या 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुण्यात लॉकडाऊन नाही पण हे नियम पाळावेच लागणार, उद्यापासून काय सुरू आणि काय बंद? मोठी बातमी, 3 महिन्यानंतर एकनाथ शिंदेंना पुन्हा मिळाली जुन्या पदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा नाही साजरा करणार वाढदिवस दरम्यान, राज्यभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन महिन्याहून जास्त कालावधीपासून नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. पुण्यातल्या या दोन ठिकाणी फक्त 4 तास उघडणार दुकानं, आज रात्रीपासून नियम लागू अशातच त्यांनी एक समस्त जनतेला एक विनंती केली आहे. ते म्हणाले की – यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. त्यांनी सर्व समर्थक आणि शिवसैनिकांना विनंती केली आहे की त्यांनी वाढदिवसानिमित्त फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावू नये. त्याऐवजी नागरिकांनी CM Relif Fund मध्ये दान करावं, रक्तदान शिबिरं भरवावी आणि कोरोनाग्रस्तांना प्लाझ्मा डोनेट करावा.
    Published by:Renuka Dhaybar
    First published: