पुण्यातल्या या दोन ठिकाणी फक्त 4 तास उघडणार दुकानं, आज रात्रीपासून नियम लागू

पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे.

पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे.

  • Share this:
    पिंपरी चिंचवड, 23 जुलै : पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. तर पिंपरी आणि थेरगाव परिसरात घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्य सेवेची दुकानं 8 ते दुपारी 12 पर्यंतच उघडी असणार आहेत. तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. दरम्यान, पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे. वहिनीनं शेतात बोलावलं म्हणून कुऱ्हाडीने केले वार, नंतर दिराचा धक्कादायक प्रयत्न कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पुण्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात 19 तारखेपासून शिथिलता देण्यात आली होती. तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत झपाट्यानं वाढ झाली. परिणामी आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करतात, हे दिसून आला. त्यामुळे बाजारपेठ आणि लग्न समारंभाबाबत प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत खरेदीसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परंतु इतक्या दिवसांनी आलेली शिथिलता आणि त्यात गटारी अमावस्येमुळे पुणेकरांनी मोठी झुंबड केली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती दरम्यान, पुण्यात लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसांत तब्बल 14109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, या दरम्यान पुण्यात 230 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे 63351 कोरोना रुग्ण आहेत. तर 22 484 रुग्णांना रुग्णालयातून डिचार्ज मिळाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 1514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक पालकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र सायबरनं केलं आवाहन ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरता नक्कीच आहे. मात्र, बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण दगवाला, असं कुठं घडलं नाही. बेड उपलब्ध असून कुणी सेवा दिली नाही तर कारवाई केली जाईल, सर्व रुग्णालयाला त्या बाबत कळविण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं.
    Published by:Renuka Dhaybar
    First published: