राजकारणातली मोठी बातमी, 3 महिन्यानंतर एकनाथ शिंदेंना पुन्हा मिळाली जुन्या पदाची जबाबदारी

राजकारणातली मोठी बातमी, 3 महिन्यानंतर एकनाथ शिंदेंना पुन्हा मिळाली जुन्या पदाची जबाबदारी

आजपासून पुन्हा एकनाथ शिंदे हेच गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री असणार आहेत. सामान्य प्रशासन विभागानं तसं पञ प्रसिद्ध केलं आहे.

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी

गडचिरोली, 23 जुलै : गडचिरोलीच्या पालकमंञी पदाची जबाबदारी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेकडे यांच्याकडे आली आहे. गेले तीन महीने कोरोनामुळे विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आजपासून पुन्हा एकनाथ शिंदे हेच गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री असणार आहेत. सामान्य प्रशासन विभागानं तसं पञ प्रसिद्ध केलं आहे.

पुण्यातल्या या दोन ठिकाणी फक्त 4 तास उघडणार दुकानं, आज रात्रीपासून नियम लागू

कोरोनाच्या संकटामुळे 15 एप्रिल रोजी वडोट्टीवार यांना गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची तात्पुरती अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आता नव्या आदेशाद्वारे गडचिरोलीचे पालकमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार वडेट्टीवार यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे जुने पालकमंत्री शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वडेट्टीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील. शिंदे हे गडचिरोली व्यतिरिक्त ठाण्याचे पालकमंत्री आहेत.

राज्याचे नगरविकास मंञी एकनाथ शिंदेकडे आली आहे. आव्हान म्हणुन मुख्यमंञ्याचे निकटवर्तीय असलेल्या एकनाथ शिंदेनी ही जबाबदारी स्वतःहुन स्वीकारल्याने जिल्हावासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

गडचिरोली जिल्हा देशातल्या अति 25 मागास जिल्ह्यांमध्ये समावेश असलेला जिल्हा आहे. राज्यात लातूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची निर्मिती एकाच वेळी झाली. मात्र, आज लातूर जिल्ह्याचा विकास हा वेगाने झालेला आहे. त्यातुलनेत गडचिरोली जिल्ह्याचा बघितल्यास अजूनही जिल्ह्याचा विकास हवा तसा झालेला नाही. या जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचा अनुशेष प्रचंड मोठा आहे. रिक्त पदावर बदली होऊनही अधिकारी रुजू व्हायला तयार होत नाहीत. अनेक समस्या अजुनही कायम आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या कामाकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 23, 2020, 8:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या