मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात लॉकडाऊन नाही पण हे नियम पाळावेच लागणार, उद्यापासून काय सुरू आणि काय बंद?

पुण्यात लॉकडाऊन नाही पण हे नियम पाळावेच लागणार, उद्यापासून काय सुरू आणि काय बंद?

पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

पुणे, 23 जुलै : पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. तर पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे. यावर पुण्यात उद्यापासून काय नियम असणार आहेत. याची नियमावली अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आली आहे. पुण्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर व्यायामासाठी मुभा मिळाली आहे. सकाळी 5 ते 7 व्यायाम करता येणार आहे. तर लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती असायला हवी. मैदानांवर गर्दी करता येणार नाही. त्यामुळे व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत. मोठी बातमी, 3 महिन्यानंतर एकनाथ शिंदेंना पुन्हा मिळाली जुन्या पदाची जबाबदारी पुणेकरांसाठी असे आहेत उद्यापासू नियम - प्रतिबंधित क्षेत्रात औषधे, दूध, भाजीपाला, किराणा-जीवनावश्यक सेवा-सुविधा सकाळी 9 ते 2 सुरू राहतील - दुकाने पी1-पी2 प्रमाणे सुरू राहतील - खाजगी कार्यालय 15 टक्के किंवा 15 जण काम करतील. यापैकी अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करू शकतील - माहिती तंत्रज्ञान -IT कंपन्यात 50 टक्के कर्मचाऱ्यांना मुभा - हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स, जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचं तलाव बंदच राहणार - हॉकर्सला व्यवसाय सुरू करता येणार - पार्सल, कुरियर सुरू पुण्यातल्या या दोन ठिकाणी फक्त 4 तास उघडणार दुकानं, आज रात्रीपासून नियम लागू - घरमालकाची परवानगी असल्यास घरेलू कामगार, जेष्ठ रूग्ण मदतनीस (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर) - लग्न समारंभ अंत्यसंस्कारासाठी 20 जणांचीच मर्यादा - सगळीकडे मास्क वापरण बंधनकाराक - जेष्ठ नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही - रात्री 9 ते पहाटे 5 कुणालाही बाहेर पडता येणार नाही - दुकानांच्या, कार्यालयाच्या वेळा सकाळी 9 ते रात्री 7 अशा राहतील - टॅक्सी, रिक्षा, खाजगी गाडी, कॅब यांना वाहक अधिक 2 जण अशी परवानगी तर दुचाकीला फक्त चालक अशी परवानगी - प्रतिबंधित क्षेत्र किंवा क्षेत्राबाहेर कोरोना बाधित व्यक्ती आढळली तर ती इमारत/चाळ, सोसायटी सील केली जाईल
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Coronavirus, Pune, Pune news

पुढील बातम्या