मोठी बातमी, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा

मोठी बातमी, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा

राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महापालिका आणि कोल्हापूर महापालिका आयुक्तांना एक पत्र पाठवले आहे.

  • Share this:

डोंबिवली, 22 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, आता अनलॉक 1 मध्ये अटी शिथिल करण्यात आल्या आहे. त्यामुळे  कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक ठरलेल्या वेळेनुसारच होणार असल्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महापालिका आणि कोल्हापूर महापालिका आयुक्तांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात आगामी निवडणुका या ठरलेल्या वेळेत घेतल्या जातील, असं स्पष्ट केले आहे.  परंतु, कल्याण डोंबिवलीतील 18 गावांच्या वेगळ्या नगरपालिका होणार का?  हा प्रश्न कायम आहे. अलीकडे राज्य सरकारने डोंबिवलीतील  27 गावांचा प्रश्न मार्गी लावला होता. यातील 9 गावे ही केडीएमसीमध्येच ठेवण्यात आली होती. तर इतर 18 गावांची नगरपालिका स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.  पण, आयोगाच्या वेळापत्रकानुसार, प्रभाग रचना कार्यक्रम हा एप्रिल आणि मे महिन्यात होणे गरजेचं होतं. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीमुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता.

भाजपमध्ये डॅमेज कंट्रोल सुरू, येत्या 15 दिवसांत या नावांना मिळणार मोठी जबाबदारी

परंतु, आता राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन (अनलॉक 1) सुरू केले असून विविध अटी शर्तीचे पालन करून  शासकीय कार्यालयांसह अनेक व्यवहार सुरू करण्यात आले आहे.  त्यामुळे या काळात कार्यालयात बसून होवू शकणाऱ्या मतदारांशी संपर्क नसणाऱ्या अशा निवडणुकांच्या टप्प्यातील कामे होवू शकता, त्यामुळे दोन्ही महापालिकांचा प्रभाग रचना तयार करण्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे राज्य आयोगाने स्पष्ट केले आहे.

तसंच राज्य निवडणूक आयोगाने दोन्ही महापालिकांना निवडणुकीकरता एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यानुसार, सदस्य संख्या, आरक्षणाची माहिती, हद्दीतील लोकसंख्येची सुधारीत आकडेवारी, कच्चा आरखडा पाठवण्याचे आदेशही दिले आहे.

आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे महत्त्वाची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी 122 जागांसाठी तर कोल्हापूर महापालिकेसाठी 81 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 22, 2020, 11:25 AM IST

ताज्या बातम्या