भाजपमध्ये डॅमेज कंट्रोल सुरू, येत्या 15 दिवसांत या नावांना मिळणार मोठी जबाबदारी

भाजपमध्ये डॅमेज कंट्रोल सुरू, येत्या 15 दिवसांत या नावांना मिळणार मोठी जबाबदारी

जुलैमध्ये भाजपात मोठे संघटनमात्मक फेरबदल होणार आहेत. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या नव्या कार्यकारणीची चर्चा सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : राज्यात एकीकडे कोरोनामुळे हाहाकार माजला असताना आता राजकीय वातावरण देखील तापलं आहे. निवडणुकांमध्ये मिळालेल्या पराभवानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल कसण्यास सुरुवात केली असल्याचं समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षामध्ये येत्या जुलै महिन्यात मोठे संघटनात्मक बदल होईल अशी माहिती मिळते आहे. चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले आहे आणि नवीन प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर त्यांची स्वतंत्र नवीन कार्यकारिणी निवडली जात असते आणि त्यानुसारच ही नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईल अशी माहिती मिळते आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये नवी मुंबई येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसांच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र जाहीरपणे हाती घेतली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते ही सूत्रं पाटील यांना सुपूर्द करण्यात आलेली होती. त्यानंतर नवीन कार्यकारणी तयार होणं अपेक्षित होतं. पण कोरोनामुळे हे काम गेले काही दिवसांपासून प्रलंबित होतं. आता मात्र नवीन कार्यकारणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात येईल अशी माहिती मिळते आहे.

पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं झाळलं, तुकडे करून फेकलं नदीत

या नवीन कार्यकारणीमध्ये भारतीय जनता पक्षाला मधल्या काही नाराज नेत्यांना स्थान देऊन, मोठी जबाबदारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळाते आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती. तिथल्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यातही मेधा कुलकर्णी यांना पक्षांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी समाज माध्यमांद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती. आता मात्र त्यांना नव्या कार्यकारणी मध्ये मोठी संघटनात्मक जबाबदारी मिळेल अशी माहिती मिळते आहे

त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेलेले माजी चंद्रशेखर बावनकुळे यांनादेखील महामंत्री म्हणून नेमले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती आपल्या सूत्रांकडून मिळते आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे अशीष शेलार यांचादेखील महामंत्री म्हणून समावेश केला जाणार आहे अशी माहिती मिळते आहे. भाजपच्या नाशिकचा आमदार देवयानी फरांदे यांनी देखील या पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आता भाजपचे इतर नाराज नेते पंकजा मुंडे, विनोद तावडे किंवा एकनाथ खडसे यांच्याकडे पक्ष काही जबाबदारी देणार आहे का हे पाहावे लागेल. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे गेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकार मध्ये असलेले मंत्री राम शिंदे यांनी देखील समाज माध्यमाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली होती. आता ही नवी कार्यकारिणी या सर्व व नेत्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होईल का हे पाहावे लागेल.

विशेषत: राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन न झाल्यामुळे भाजप स्वत:ला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न करतंय. यात नाराजांना सांभाळत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संघटना कशी चालवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

आधी कुपोषण आता अंधश्रद्धेचा कळस, पोटफुगीमुळे चिमुकल्यांना दिले लोखंडी सळीचे चटके

संपादन - रेणुका धायबर

First published: June 22, 2020, 10:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या