आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे महत्त्वाची मागणी

आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे महत्त्वाची मागणी

आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका 'आरोग्य सैनिक' बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात.

  • Share this:

मुंबई, 22 जून : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या परिस्थितीत जीवाची बाजी लावून आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे नवी मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी आशा स्वयंसेविकांनी कृष्णकुंजवर जाऊन अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी अजित पवार आणि राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात अमित ठाकरे म्हणाले की, ''परवा काही 'आशा' स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त 1600 रुपये मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र 'आशां'ना दर महिन्याला 4000 ते 10000 रुपये इतका मोबदला मिळत आहे.'

'आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका 'आरोग्य सैनिक' बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे.

त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून द्यावा', अशी मागणी अमित ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा -विखे पाटील भाजपातले बाटगे तर राणे पावटे, शिवसेनेचा सणसणीत टोला

संपादन - सचिन साळवे

 

First published: June 22, 2020, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading