शिवसेनेत शोककळा, कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक देवळेकर यांचे निधन

शिवसेनेत शोककळा, कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक देवळेकर यांचे निधन

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.

  • Share this:

कल्याण 23 सप्टेंबर : कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. देवळेकर यांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते त्यातून बरेही झाले होते. पण यादरम्यान त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. देवळेकर यांच्या जाण्याने कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे.

'मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ??'

देवळेकर यांच्या निधनाबाबत सर्वपक्षीय राजकारणी, लोकप्रतिनिधीनी शोक व्यक्त केला आहे. खरंतर, कोरोनाच्या या संकटात काम करणाऱ्या अनेक नेत्यांना, आरोग्य देवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोनाने वेढलं आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाला हरवण्यासाठी संपूर्ण देश सध्या प्रयत्नात आहे. यासाठी प्रत्येक शहरात लॉकडाऊन करण्यात आलं. पण तरीदेखील कोरोनाचा धोका काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये.

24 तासांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त, अशी आहे आजची आकडेवारी

दरम्यान, राज्यात गेल्या तीन दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मंगळवारी 20 हजार 200 रुग्ण बरे झाले. तर 18 हजार 390 रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे बरे होण्याचं प्रमाणाची टक्केवारी 75 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 398 लोकांचा करोन मुळे मृत्यू झाला.

राज्यात दिवसभरात राज्यात कोरोनाच्या 1 लाख 5 हजार 26 चाचण्या झाल्या आहेत. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार रुग्णावर उपचार सुरू आहेत. 12 लाख 42 हजार 770 एवढी झाली आहे.

Mumbai Rains Alert: पुढील 24 तास धोक्याचे, नागरिकांनो घराबाहेर पडू नका

सोमवारी तब्बल 32 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आत्तापर्यंत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची ही सर्वोच्च संख्या होती.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 23, 2020, 11:04 AM IST

ताज्या बातम्या