मुंबई, 23 सप्टेंबर : रात्रीभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. पण असं असतानाही पाऊस काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये.
मुंबई, ठाणे, पालघर भागात पुढील 24 तासांत काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज तर दक्षिण कोकण भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह एमएमआरडीए भागात कुलाबा वेधशाळेन पावसाचा अलर्ट दिला आहे.
धो-धो पावसानं अख्खी मुंबई पाण्याखाली, पाण्याचं रौद्र रुप दाखवणारे 16 PHOTOS
मुंबई आज पहाटे... मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी जमा. रेल्वे व रोड वाहतूक वर परिणाम. येत्या 24 तासात जोरदार पावसांची शक्यता, पण त्या मानाने जोर कमी. पण गेल्या 24 तासातील मुसळधार पावसाचा प्रभाव आज ही दिसेल. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड...🌧🌧🌧🌧🌧 काळजी घ्या, pic.twitter.com/HDnX7IM4n8
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 23, 2020
रात्रीच्या तुलनेन मात्र पावसाचा जोर थोडा कमी राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती कुलाबा वेधशाळा उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान, 24 तासांत मुंबईत धुवांधार पाऊस झाला आहे. शहर 267.62 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असू पश्चिम उपनगरां 251.48 मिमी पाऊस तर पूर्व उपनगर 173.22 मिमी पाऊस झाला आहे.
नवी मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुंबई शहरात 186 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर पूर्व उपनगरात 154 मिमी, पश्चिम उपनगरांत 208 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मुसळधार पावसानं मुंबईकरांची झोप उडवली! वाहतुकीचे तीन तेरा, घरांमध्ये शिरलं पाणी
अत्यावश्यक सेवा वगळता आज मुंबई राहणार बंद
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.