नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : भारतात कोरोनाचा (Covid-19 Infected) धोका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. देशात रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर येत आहेत. मागील 24 तासांमध्ये 83 हजार 347 नवी प्रकरणं समोर आली आहे तर 1085 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या कालच्या आकडेवारीमुळे देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 56 लाख 46 हजार 11 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडाही 90,020 वर पोहोचला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासामध्ये 87,007 लोकांनी कोरोनावर मात करत बरे झाले आहेत. यासोबत रुग्ण बरे होण्याची संख्या आता 45 लाख 87 हजार 614 पर्यंत पोहोचली आहे. तर देशात सध्या कोरोनाची 9 लाख 68 हजार 377 अॅक्टिव्ह प्रकरण आहेत.
Mumbai Rains Alert: पुढील 24 तास धोक्याचे, नागरिकांनो घराबाहेर पडू नका
देशात 12 राज्ये अशी आहेत जिथे बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 81% पेक्षा जास्त आहे. त्यापैकी अंदमान-निकोबार, दादरा-नगर हवेली आणि बिहारमधील बरे होण्याचा दर 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत देशात 43.95 लाख रुग्ण बरे झाले आहेत आणि कोरोनाव्हायरस रिकव्हरी दर 80.12% पर्यंत पोहोचला आहे.
तलावारीचा धाक दाखवत आरोपींनी लुटला बार, नागपूरमधील घटनेचा धक्कादायक CCTV समोर
देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणं समोर येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्लीचा समावेश आहे. दरम्यान, पुढील 3 महिने संसर्गाचा अधिक धोकादायक आहे. म्हणून कोरोनाचे नियम पाळणे आणि विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.