Home /News /maharashtra /

Eknath Shinde Guwahati : एकनाथ शिंदेचे पारडे आणखी जड, मुंबईतील ठाकरेंचा कट्टर समर्थक आमदार नॉट रिचेबल

Eknath Shinde Guwahati : एकनाथ शिंदेचे पारडे आणखी जड, मुंबईतील ठाकरेंचा कट्टर समर्थक आमदार नॉट रिचेबल

शिवसेनेत (shiv sena) पडलेल्या उभ्या फुटीला आता एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाचे पारड हळूहळू जड होत चालले आहे.

  मुंबई, 24 जून : शिवसेनेत (shiv sena) पडलेल्या उभ्या फुटीला आता एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाचे पारड हळूहळू जड होत चालले आहे. शिंदे यांनी दोन्ही काँग्रेससोबत (ncp and congress) आता सत्तेत रहायचे नाही अशी भुमीका घेत एकनाथ शिंदे यांनी थेट बंडखोरी करत गुवाहाटी (eknath shinde in guwahati) गाठले. दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून शिवसेनेचे एक एक करत जवळपास 40 आमदार आपल्या गोटात घेतले. काल दादा भुसे (dada bhuse) यांच्यासह अनेक आमदार गुवाहाटीला गेले आहेत याच्यापाठोपाठ आता दिलीप लांडे (shiv sena dilip lande) जात असल्याचे बोलले जात आहे त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. यामुळे एकनाथ शिंदे गटात ते सामिल होतील असे बोलले जात आहे.

  दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी बराच वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांचा फोन लागत नसल्याने लांडे नेमके गेले कुठे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  हे ही वाचा : Eknath Shinde Guwahati : कारवाईच्या धमकीनंतर शिंदे गट आक्रमक, तातडीने बैठक बोलावली, जशास तसे उत्तर देणार?

  मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. हे मागच्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत.

  एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे अरवींद सांवत यांनी केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असुन सुद्धा न आल्याचं कारण देत शिवसेनेकडून 12 आमदारांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  "12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत", असंदेखील ते म्हणाले. "आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे", असं शिंदे म्हणाले.

  हे ही वाचा : आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र आलं समोर

  खासदार अरविंद सावंत काय म्हणाले

  एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे अरवींद सांवत यांनी केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असुन सुद्धा न आल्याचं कारण देत शिवसेनेकडून 12 आमदारांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, NCP, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या