Home /News /maharashtra /

Eknath Shinde Guwahati : कारवाईच्या धमकीनंतर शिंदे गट आक्रमक, तातडीने बैठक बोलावली, जशास तसे उत्तर देणार?

Eknath Shinde Guwahati : कारवाईच्या धमकीनंतर शिंदे गट आक्रमक, तातडीने बैठक बोलावली, जशास तसे उत्तर देणार?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde Guwahati) यांनी शिवसेनेतील 40च्यावर आमदार फोडत गुवाहाटी (Guwahati) येथून सवता सुभा मांडण्याची गणिते मांडत आहेत.

    मुंबई, 24 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde Guwahati) यांनी शिवसेनेतील 40च्यावर आमदार फोडत गुवाहाटी (Guwahati) येथून सवता सुभा मांडण्याची गणिते मांडत आहेत. दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह घेण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे गटातील 12 आमदारांचे निलंबण करण्याची तयारी उद्धव ठाकरेंकडून (cm uddhav thackeray) सुरू आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि ठाकरे (eknath shinde and uddhav thackeray) यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत (mp arvind sawant) यांनी कारवाई करणार असल्याचे सांगताच एकनाथ शिंदे गटाकडून तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

    खासदार अरविंद सावंत काय म्हणाले

    एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे अरवींद सांवत यांनी केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असुन सुद्धा न आल्याचं कारण देत शिवसेनेकडून 12 आमदारांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

    हे ही वाचा : 'कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

    एकनाथ शिंदे काय म्हणाले

    शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतंच एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) उद्देशून आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. "कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    हे ही वाचा : बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?

    "12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत", असंदेखील ते म्हणाले. "आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे", असं शिंदे म्हणाले.

    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या