Home /News /maharashtra /

आधी राज ठाकरे म्हणाले, 'राऊतांनी एकांतात बोलण्याची सवय करावी', आता देवेंद्र फडणवीसांचा ईडी चौकशीवरुन सवाल

आधी राज ठाकरे म्हणाले, 'राऊतांनी एकांतात बोलण्याची सवय करावी', आता देवेंद्र फडणवीसांचा ईडी चौकशीवरुन सवाल

"संजय राऊत रोज घाबरत-घाबरत पत्रकार परिषद घेतात. संजय राऊत यांना मी सांगू इच्छितो मला नोटीस मिळाली ते मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, हो मला नोटीस मिळाली", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    मुंबई, 13 मार्च : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज सलग दोन तास पोलीस चौकशी झाली. या चौकशीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण कोण्त्याच चौकशीला घाबरत नसल्याचं विधान केलं. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला. आम्ही चौकशीला सामोरे जायला घाबरत नाही. पण संजय राऊत चौकशीला जाण्यासाठी घाबरतात. त्यामुळे ते रोज घाबरत-घाबरत पत्रकार परिषद घेतात आणि तपास यंत्रणांवर आरोप करतात, अशी टीका फडणवीसांनी केली. संजय राऊत यांच्यामागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या चौकशीवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील राऊतांनी आता एकांतात बोलण्याती सवय करुन घ्यावी, असा खोचक टोला लगावला आहे. त्यानंतर फडणवीसांनी राऊत घाबरले असल्याचं विधान केलं. "संजय राऊत रोज घाबरत-घाबरत पत्रकार परिषद घेतात. संजय राऊत यांना मी सांगू इच्छितो मला नोटीस मिळाली ते मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, हो मला नोटीस मिळाली. मी त्या ठिकाणी चौकशीसाठी जाणार आहे. मला तर सरकारने विनंती केली की, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. पोलिसांनी विनंती केली की येऊ नका. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. मग माझा सवाल आहे की, संजय राऊत यांच्यावर अशी परिस्थिती आली की ते का घाबरतात? ते का तपास यंत्रणांवर आरोप करतात?", असे सवाल फडणवीसांनी केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, "भाजप नेते फक्त बोलतात. आम्ही कोणत्याही पद्धतीने सूडबुद्धी कारवाई करत नाही. आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो." आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर फडणवीसांनी मिश्किल उत्तर दिलं. "हे त्यांना कुणी लिहून दिलं असेल ते मला माहिती नाही. थोडी सुधारणा केली तर अधिक चांगलं", असा खोचक टोला त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत काय-काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात बदल्यांचा जो महाघोटाळा झाला. या घोटाळ्याची सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांकडे पोहोचवली. त्यानंतर न्यायालयाने याची चौकशी सीबीआयकडे सोपवली. याचाच अर्थ महाघोटाळा घडला म्हणून सीबीआय ही चौकशी करत आहेत. महाघोटाळ्याची चौकशी राज्य सरकार करु शकत नाही कारण, सहा महिने त्यांनी अहवाल दडवून ठेवला होता. मी जर हा घोटाळा बाहेर काढला नसता तर कोट्यावधींचा घोटाळा दबून राहिला असता. सभागृहात विषय मांडत असल्याने मला अचानक नोटीस सभागृहात जे विषय मी मांडतोय, मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊद सोबत कनेक्शन असेल किंवा विरोधी पक्षाच्या विरोधात हे सरकार कसं षडयंत्र करत आहे. यामुळेच मला अचानक पोलिसांची नोटीस आली. मी पोलिसांकडे चौकशीसाठी जाण्यासाठी तयार होतो. पण नंतर पोलिसांनी विनंती केली की, मी तुमच्याकडे चौकशीला आमची टीम पाठवतो. (अजबच! इथे जाड पुरुषांना मिळतो सर्वाधिक आदर; पोटाचा घेर वाढवण्यासाठी पितात रक्त) आजच्या चौकशीचा रोख असा होता की, जणूकाही ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टचं जणूकाही मी उल्लंघन केलं आहे. मला आरोपी, सहआरोपी बनवण्यात येईल का अशा प्रकारचे प्रश्न होते असाही गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हा घोटाळा मी बाहेर काढला आहे आणि तो न्यायालयाने सुद्धा मान्य केला आहे. पोलिसांना मी सांगितलं, मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. त्यासंदर्भातील पत्रही मी पोलिसांना दाखवलं. त्यासोबतच पत्रकार परिषदेत मी सांगितलं की, मी ट्रान्सक्रिप्ट किंवा पेन ड्राईव्ह कुणाला देणार नाही कारण हे मटेरिअल सेन्सेटिव्ह आहे. राज्य सरकारला तर ही माहिती देऊ शकत नाही. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागदपत्र राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते. या सर्व कागदपत्रांमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांची नावे होती आणि आयपीएस अधिकाऱ्यांची कॉम्पिटेंट अथॉरिटी केंद्रीय गृहसचिव असल्याने ही सर्व कागदे मी केंद्रीय गृहसचिवांना दिली. तसेच सेन्सेटिव्ह मटेरिअल मी उघड केली नाही. पण त्याचवेळी सीक्रसीचा भंग झाला असेल तर तो कुणी केला? जी कागदपत्रे मी केंद्रीय गृहसचिवांंना दिली ती कागदपत्रे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, Maharashtra politics, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या