नवी दिल्ली 13 मार्च : जगात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या श्रद्धा आणि चालीरीतींमुळे चर्चेत राहतात (Weird Traditions). जसजशी शहरे आणि आधुनिकता विकसित होत आहे, तसतशा समाजातून अनेक प्रथा लोप पावत आहेत. पण आजही जंगलात आणि मागासलेल्या भागात अशा जमाती आहेत ज्या जुन्या परंपरा जपत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र परंपरेबद्दल सांगणार आहोत. ज्याचं पालन आफ्रिकेतील एक जमात करते. इथले लोक गाईच्या दुधासोबत रक्त पितात जेणेकरून ते लठ्ठ व्हावे (Men Drinks Cow Milk and Blood Mixture to Become Fat) . एकीकडं जगभरातील लोक सडपातळ होण्यासाठी मेहनत करतात, त्यांना सिक्स पॅक अॅब्स बनवून स्मार्ट दिसायचं असतं, तर दुसरीकडं आफ्रिकेतील ज्या जमातीबद्दल आम्ही सांगत आहोत, तिथले पुरुष जाड होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आपल्या पोटाचा घेर आणखी वाढवण्याचं वेड आहे (Men Compete to Increase Belly fat) . या जमातीतील जाड पुरुषांना सुपरस्टारसारखा दर्जा मिळतो. या जमातीचं नाव बोडी जमात आहे, जी आफ्रिकेच्या इथिओपियामध्ये आढळते.
शरीराला पाणी कमी पडलं की अशी लक्षणं लगेच दिसतात; वेळीच ओळखून धोका टाळा
इथिओपियाच्या ओमो व्हॅलीच्या आतील भागात ही जमात राहते. इथे एक अतिशय विचित्र समज आहे. इथले तरुण गाईचं रक्त आणि दूध एकत्र करून पितात आणि चरबी वाढवण्याचा प्रयत्न करतात. ते रक्त पिण्यासाठी गाईला मारत नाहीत, तर त्यांच्या शरीरातील रक्तवाहिनी कापतात आणि हे रक्त गाईच्या दुधात मिसळून पितात. इथे जे पुरुष जास्त पोट वाढवतात, त्यांना संपूर्ण टोळीचा नायक मानलं जातं. इथे नवीन वर्ष सुरू होताना कायल नावाचा समारंभ होतो. खरं तर हे पुरुषांमधील स्पर्धेसारखं आहे, ज्यामध्ये अविवाहित पुरुषांना रक्त आणि दुधाचं द्रावण प्यावं लागतं. स्पर्धेत उभं राहण्यासाठी ते ६ महिने आधीच तयारी सुरू करतात. या 6 महिन्यांत ते कोणत्याही महिलेशी संबंध ठेवू शकत नाहीत आणि आपल्या झोपडीतून बाहेर पडू शकत नाहीत. या दरम्यान ते रक्त आणि दूध पीत राहतात. पहिला कप 2 लिटरचा असतो जो सूर्योदयाच्या वेळी प्यायला जातो. उर्वरित कप दिवसभर कधीही पिता येतात.
आपल्या या चुकीच्या सवयींमुळं हाडं होतात कमकुवत; आजपासूनच करा बदल
स्पर्धेच्या दिवशी आपल्या अंगावर राख आणि माती टाकून ते आपलं लठ्ठ शरीर संपूर्ण गावासमोर दाखवतात आणि उडी मारून आपलं वर्चस्व प्रस्थापित करतात. याशिवाय पवित्र वृक्षांच्या प्रदक्षिणाही तासनतास होतात. दरम्यान, ज्येष्ठ व्यक्ती या पुरुषांपैकी कोण अव्वल आहे आणि चांगली कामगिरी करत आहे हे ठरवतात. मग ते गाईचा बळी देतात आणि तिचे आतडे पाहून ठरवतात येणारं वर्ष कसं असेल. गावातील सगळ्यात धष्टपुष्ट माणूस म्हणून जिंकणाऱ्याचं वर्षभर कौतुक केलं जातं.