मुंबई, 03 फेब्रुवारी : भाजप शब्दाला जागला असता तर मी मुख्यमंत्री पदावर बसलो नसतो अशा शब्दात सामनाच्या मुलाखतून उद्धव ठाकरेंनी भाजपला टोमणा लागवला आहे. तसंच मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे हे विधान भवनातील कोणत्या सभागृहाचे सदस्य बनणार यासंदर्भात सर्वांना उत्सुक्ता होती. आज प्रसिद्ध झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत त्यांनी मी कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी निवडणुक लढवेन असं सांगितलं आहे. पण नेमक्या कोणत्या जागेवर उद्धव ठाकरे लढणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या दोन ते तीन महिन्यात विधान परिषद सदस्य होण्यासाठी निवडणुक लढवणार हे आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री पदावर असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना विधान सभा किंवा विधान परिषद यांच्या पैकी एका सभागृहाचं सदस्य बननं आवश्यक आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या मुदतीपुर्वी त्यांना आता विधान परिषद सदस्य बननं आवश्यक आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की उद्धठ ठाकरे कोणत्या जागांवर लढणार.
दरम्यान, यासंबंधी मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी काय प्रश्न विचारला आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं वाचूयात...
आपण मघाशी उल्लेख केला की, बाळासाहेबांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही; पण आता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल…
– हो. ते तर ओघानं आलंच.
आता तुम्ही निवडणूक कुठून आणि कशी लढणार? की तेसुद्धा शेवटपर्यंत रहस्यच ठेवणार आहात?
– रहस्य नाही. येत्या दोन-चार महिन्यांत मला हा निर्णय घ्यावा लागेल.
तुम्हाला विधानसभेत जायला आवडेल की विधान परिषदेत?
– तुम्हाला सांगू का! मुळात मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन.
इतर बातम्या - हे पद झेपेल का?असं शिवसेनाप्रमुखांना वाटलं असतं, आठवणीने गहिवरले उद्धव ठाकरे
पण तुम्ही विधानसभेत जाणार की विधान परिषदेत…
– ताबडतोबीने आता मला वाटतं विधान परिषदा येतील. विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुका घेऊन…
म्हणजे विधान परिषदेत जाणार?
– विधान परिषदेपेक्षा माझे मत असे आहे की, ही जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे.
पण ही तर राज्यघटनेनं निर्माण केलेली व्यवस्था आहे…
– आहेच ना. मी कोणत्याही दारातून आलेलो नसल्यानं मी म्हणेन, मी वरून पडलोय…छपरातून.
बाळासाहेबांच्या आठवणीने उद्धव ठाकरे गहिवरले
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रश्नांना बेधडक उत्तर दिली. यावेळी बाळासाहेब आणि माँसाहेब म्हणजेच मिनाताई ठाकरे यांच्या आठवणीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गहिवरून गेले.
आज जर माँसाहेब असत्या तर त्यांना काय वाटलं असतं, असा विचार कधी तुम्ही करता का? असा प्रश्न खासदार राऊत यांनी त्यांना विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, माँ कशाला… बाळासाहेब असते तरी त्यांना असं वाटलं असतं की, अरे बापरे! याला हे झेपेल की नाही! माँच्या बाबतीत मातृसुलभ अशी आपल्या मुलाबाबत भावना नक्कीच असली असती. त्याच बरोबरीने कौतुकही नक्कीच असलं असतं. मला झेपेल की नाही असा प्रश्न कधीच पडला नव्हता. मी जे काही करतो ते तळमळीने करतो.
मनापासून करतो. कोणतीही जबाबदारी घ्यायची तर त्या विषयाच्या खोलवर जाऊन अभ्यास करायचा आणि त्यात चांगल्यात चांगले काम करता येईल हाच प्रयत्न करायचा. हा माझा नेहमीचाच प्रयत्न असतो आणि राहणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election 2019, Maharashtra, Mumbai, Narendra modi, NCP, Pune, Sharad pawar, Shivsena