जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Andheri East Bypoll : राजची साद, पण 'क्रेडिट' पवारांना, अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल

Andheri East Bypoll : राजची साद, पण 'क्रेडिट' पवारांना, अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल

Andheri East Bypoll : राजची साद, पण 'क्रेडिट' पवारांना, अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांना आज पत्र लिहिलं. राज ठाकरे यांच्या या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार   यांनीही ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. शरद पवारांच्या या मागणीनंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनीही पुढचं पाऊल टाकत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र लिहिलं. उद्धव ठाकरेंच्या या पत्रामध्ये शरद पवारांचं कौतुक करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला. शिवसेना कुटुंबाकडून आभार, या मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं आहे, पण या पत्रात राज ठाकरे यांचा उल्लेखही नाही. तसंच उद्धव ठाकरेंनी भाजपच्या जुन्या नेत्यांचा दाखला देत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी साद घातली आहे. ‘कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा’, उद्धव ठाकरेंच्या त्या पत्रानंतर मनसेचा पलटवार काय म्हणाले उद्धव ठाकरे? राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्व. रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणुक लागली आणि शिवसेनेने श्रीमती ऋतुजाताईंना उमेदवारी देण्याचा निश्चय केला. त्यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला मात्र न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेल आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. स्व. गोपीनाथजी मुंडे, आर.आर पाटील, भाजपच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने समाजिक चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या जाण्याने कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त करताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पोटनिवडणुकीत दिला नाही. ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेबांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , विलासराव देशमुख, प्रमोद महाजन , शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल अशी मला खात्री आहे. जय महाराष्ट्र आपला नम्र उध्दव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंची मागणी, भाजपने माघार घेतली तरी अंधेरीची निवडणूक निश्चित! हे आहे कारण m

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात