मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार झाल्या तर हीच रमेश लटकेंच्या आत्म्याला शांती मिळेल, असं राज ठाकरे त्यांच्या पत्रात म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. शरद पवारांच्या या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला. शिवसेना कुटुंबाकडून आभार, असं म्हणत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, पण उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर मनसेने त्यांच्यावर पलटवार केला आहे.
राजसाहेब एक म्हण आठवली "कपटी भावा पेक्षा दिलदार शत्रू बरा" pic.twitter.com/S9VHNEl4ja
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 16, 2022
शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी साद घातली, त्यावर लगेच उद्धव ठाकरे यांनी आभार मानणारे पत्र लिहिलं. या पत्रात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनी फडणवीसांना विनंती केलेल्या पत्राबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही, त्यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी खोचक ट्वीट केलं आहे. ‘राजसाहेब एक म्हण आठवली कपटी भावापेक्षा दिलदार शत्रु बरा’, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. शरद पवारांच्या एका पत्रकार परिषदेने महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? फडणवीसांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष