मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लवासाप्रकरणात पुन्हा न्यायालयात याचिका; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले पवार कुटुंबावर...

लवासाप्रकरणात पुन्हा न्यायालयात याचिका; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले पवार कुटुंबावर...

लवासाप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे.

लवासाप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे.

लवासाप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 डिसेंबर :  लवासा सीटी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या याचिकेला नंबर मिळाला असून, या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ॲड. नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही फौजदारी स्वरुपाची याचिका दाखल केली आहे. शरद पवार, अजित पवार , सुप्रिया सुळे, अजित गुलाबचंद यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी लवासाला परवानगी दिली त्या सर्वांवर सीबीआयने गुन्हे दाखल करावेत आणि त्याचा तपास करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी याचिकाकर्त्यांना जोरदार टोला लगावला आहे.

अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं?

लवासामधील सर्व गोष्टी या पारदर्शक पद्धतीने झाल्या आहेत. प्रसिद्धीसाठी अशाप्रकारचे आरोप  केले जातात. त्यांना माहीत आहे पवार कुटुंबावर आरोप केल्यानंतर प्रसिद्धी मिळते. अशाप्रकारची प्रसिद्धी मिळवण्यासाठीच हे आरोप करण्यात आले आहेत. लवासामधील सर्व गोष्टी पारदर्शक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा :  Sharad Pawar Lavasa City : लवासा सीटी प्रकरणी शरद पवारांना धक्का? प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात

याचिकाकर्त्यांचा नेमका आरोप काय? 

लवासा सीटी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  ॲड. नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.   शरद पवार, अजित पवार , सुप्रिया सुळे, अजित गुलाबचंद यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी लवासाला परवानगी दिली त्या सर्वांवर सीबीआयने गुन्हे दाखल करावेत आणि त्याचा तपास करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर आता नवीन वर्षात सुनावणी होण्याची शक्यात आहे.

First published:

Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar, Supriya sule