Home /News /lifestyle /

15 ऑगस्टपासून लोकल प्रवास होणार सुरू; होऊ नका Coronaचे वाहक, अशी घ्या काळजी

15 ऑगस्टपासून लोकल प्रवास होणार सुरू; होऊ नका Coronaचे वाहक, अशी घ्या काळजी

लक्षात ठेवा प्रवासातला निष्काजीपणा (Careless) आपल्याबरोबर आपल्या घरच्यांसाठी कोरोनाचा (Corona) वाहक ठरू शकतो.

    दिल्ली, 09 ऑगस्ट :  कोरोनाने (Corona) गेल्या दीड वर्षात जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दोन लाटांमुळे जगात जिवितहानी झाली आहे. तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता असल्याने, अद्याप सर्वसामान्यांना लोकल प्रवास (Train Travel) बंद आहे. कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’  (Work From Home) असल्याने रेल्वे प्रवास पार मर्यादित लोकांना आणि आपत्कालीन सेवेतील (Emergency Service) कर्मचाऱ्यांसाठी सुरू असला तरी, प्रवासामध्ये कोरोनाची लागण (Corona Infection) होण्याची भीती जास्त आहे. 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तरीही ज्यांना लोकल प्रवास करावा लागत आहे त्यांना प्रवासादरम्यान विषेश काळजी (Special Care) घ्यावी लागते. कोरोनापासून स्वत:चं संरक्षण (Safety) करण्यासाठी प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती जाणून घ्या. प्रवासाची तयारी सकाळी ऑफिससाठी निघणार असाल तर, आपली पर्स किंवा बॅग आदल्या रात्रीचं भरून ठेवा. टिफीन सोडून त्यात इतर आवश्यक साहित्य ठेवा. जेणेकरून सकाळी गडबड होणार नाही. नॅपकिन, टिशू पेपेर, सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्ड हे साहित्य आवर्जून ठेवा. (ड्राय स्किन,थकवा येणं ; ‘Low Blood Sugar’ मुळे होतात अनेक त्रास) रिक्षा किंवा बस प्रवास शक्यतो वेळेआधीच निघा म्हणजे रिक्षा किंवा बस पकडताना गडबड होणार नाही. रिक्षाने प्रवास करताना शक्यतो शेअरिंग रिक्षा टाळा. बसने प्रवास करताना ठराविक प्रवासी क्षमतेने जाणाऱ्या बसमध्ये चढा. जास्त गर्दी असेल तर, चढू नका. लक्षात ठेवा गर्दीमधून कोरोना पसरू शकतो. शिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळता येत नाही. बसने उभ्याने प्रवास करणं चांगलं. रिक्षात बसताना सीटवर सॅनिटायझर स्प्रे करायला विसरू नका. खाली उतरल्यावर हातांना सॅनिटायझर लावा. लोकल प्रवास स्टेशनवर गेल्यावर कमी गर्दीच्या ठिकाणी उभे रहा. सोशल डिस्टन्सिंग पाळा. ट्रेनमध्ये चढताना शक्यतो रांगेत आणि गर्दी होणार नाही अशा पद्धतीने चढा. चढताना गाडीला किंवा हॅन्डलला कमीत कमी स्पर्श करा. सिटवर बसण्याआधी स्वच्छतेची काळजी घ्या. सॅनिटायझर स्प्रे करा. खिडकी जवळ बसले असाल तर, स्पर्श करू नका. (तुम्हाला नाहीत ना ‘या’ वाईट सवयी? वेळेआधीच दिसायला लागाल म्हातारे) हॅन्डल ट्रेनमध्ये प्रवास करताना आधारासाठी आपण याआधी हॅन्डलला हात लावत असू पण, आता शक्यतो हात लावणं टाळा. हात लागलाच तर, हाताला सॅनिटायझर लावा. मास्क कोरोनाकाळात मास्कला सुरक्षा कवच म्हटलं तर, ते चुकीचं ठरणार नाही. घरामधून बाहेर पडताना मास्क लावून बाहेर पडा आणि बॅगमध्ये एक्सट्रा मास्क ठेवा. स्वच्छ मास्क वापरा. शक्यतो डिस्पोजेबल मास्क वापरणं चांगलं. काही लोक केस झाकण्यासाठी कॅपही वापरतात. (खा गोड पदार्थ बिनधास्त! हे आहेत सोपे Low Calorie Desserts; वाढणार नाही वजन) चष्मा चष्मा असल्यास प्रवासामध्ये वापरणं टाळा. पण, टाळणं अशक्य असेल तर, जास्त काळजी घ्या. चष्मा लावण्याआधी आपला चेहरा टिशू पेपरने पुसा. त्यानंतर चष्मा लावा. चष्मा वापरणाऱ्यांनी मास्क बरोबर फेस शिल्डचा वापर करणं आवश्यक आहे. म्हणजे चष्म्यावर हवेतले जंतू पडणार नाहीत. कारणं, चष्मा आपल्याला दिवसभर वापरायचा असतो. घरी गेल्यावर रोज चष्मा स्वच्छ करा. सॅनिटायझर कोरोना येण्याच्या आधीपासून सॅनिटायझरचा वापर सगळ्यांना माहिती होता. आता वापर वाढला आहे. बॅगमध्ये हाताला लावण्यासाठी आणि आवश्यकत्या ठिकाणी स्प्रे करण्यासाठी सॅनिटायझर जवळ बाळगा. हाताला सॅनिटायझर लावण्यासाठी वापरणारी बॉटल बॅगच्या बाहेरच्या पॉकेटमध्ये ठेवा म्हणजे पटकन वापरता येईल. चांगल्या प्रतिचं सॅनिटायझर वापरा. (मद्यपान करताना हे 5 पदार्थ ठरतात घातक Combination; चुकूनही खाऊ नका) पर्स रोजच्या प्रवासात पर्स, बॅग महत्वाचा भाग असतात. त्यांची स्वच्छता आता महत्वाची झाली आहे. घरी गेल्यावर किंवा प्रवासात असताना आपलाय खुपवेळा हात पर्स किंवा बॅगला लागतो, तो हात तोंडाला लागण्याचाही शक्यता असते त्यामुळे लगेच सॅनिटाझर लावा. घरी गेल्यावर बॅग, पर्स स्वच्छ करा. फेसशिल्ड मास्क वापरत असाल तरी फेशशिल्डही वापरा. कोरोना खोकल्याने, शिंकल्यानेही पसरतो. फेसशिल्डमुळे कोरोनाचे विषाणू हवेमधून थेट तुमच्या चेहऱ्यावर येणार नाहीत. कारण प्रवासात सतत चेहरा पुसणं शक्य नसतं. कोरोनाचा विषाणू प्लॅस्टिक किंवा स्टेनलेस स्टिलवर 2 ते 3 दिवस जिवंत राहू शकतो. असं शास्त्रज्ञांचं मत आहे. शिवाय बदलत्या तापमानाबरोबर जुळवून घेण्याची त्याची क्षमता आहे.   (मुलाच्या 16 वर्षीय मित्राच्या प्रेमात पडली 7 मुलांची आई; लग्न केल्यानंतर...) हाताचा वापर टाळा रेल्वे प्रवासात शक्यतो दरवाचा उघडताना हाताऐवजी कोपराचा वापर करावा. हे ऐकायला कठीण वाटलं तरी, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे.   पुस्तक काही लोकांना प्रवासात पुस्तक वापरण्याची सवय असते. कोरोना काळातही रेल्वे प्रवासाता पुस्तक वाचणार असाल तर, पानं बदलताना पुस्तकाला स्पर्श झाल्यावर तोच हात इतरत्र लागणार नाही याकडे लक्ष द्या. मधूनमधून हाताला सॅनिटायझर लावत रहा. पुस्तक ठेवताना त्यासाठी वेगळी पिशवी बाळगली तर, उत्तम. मोबाईल कितीही टाळलं तरी, प्रवासात मोबाईलचा वापर आपण करतोच. अशा वेळेस त्याची स्वच्छता महत्वाची आहे. बाजारात झिप लॉक पिशव्या मिळतात. त्यात मोबाईल ठेवला तर, तो कोरोनाच्या विषाणूंपासून सुरक्षित राहू शकतो. कारण मोबाईलला थेट सॅनिटायझर लावणं घातक असतं. (Parenting Tips: लगेच टेन्शन घेऊ नका! बाळाला शिंका येण्याची ‘ही’ आहेत कारणं) हेडफोन प्रवासात मोबाईलवर व्हीडिओ पाहण्यासाठी कानाला हेडफोन लावले जातात. त्यामुळे बॅगमध्ये ठेवताना त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. हेडफोनसाठी वेगळा पॉउच किंवा पिशवी वापरा. म्हणजे वापरल्यावर आत ठेवताना टेन्शन वाटणार नाही. यशिवाय पावाळ्यात छत्री किंवा झिपर आपण वापरतोच त्याची पिशवी किंवा छत्रीचं हॅन्डल पकडना काळजी घ्या सॅनिटायझेशन करा. लक्षात ठेवा प्रवासाला निष्काजीपणा आपल्याबरोबर आपल्या घरच्यांसाठी कोरोनाचा वाहक ठरू शकतो. घरी गेल्यावर स्वच्छ आंगोळ करा, कपडे लगेच धुवा, चप्पल इतर चप्पल बरोबर ठेवू नका.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Lockdown, Train

    पुढील बातम्या