नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : हल्ली लठ्ठपणाची समस्या वाढलेली आहे. त्यामुळेच हलका आणि कमी कॅलरीज असणारा डायट घेण्याकडे कल वाढलेला आहे. शिवाय लठ्ठपणाने होणारे आजार लक्षात घेता अनेक जण साखर देखील कमी वापरतात. मात्र गोड खाण्याची इच्छा झालेली असताना लो कॅलरी डायटमुळे मन मारावं लागतं. अशात लो कॅलरी डेझर्ट खाण्याची इच्छा असेल तर हा हेल्दी पर्याय नक्कीच वापरू शकता. ओट्सचे लाडू- हेल्दी आणि चविष्ट पदार्थ म्हणून ओट्सचे लाडू खाऊ शकता. यामध्ये तूप गुळ आणि ड्रायफ्रूट असतात. यामुळे पौष्टिकपणा जास्त असल्याने वजन वाढण्याची भीती राहत नाही. शिवाय आपली भूक कमी होते. नाचणीची बर्फी**-** नाचणी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. याच्या पिठापासून बर्फी तयार करून आपण आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू शकतो. डार्क चॉकलेट ब्राऊनी-डार्क चॉकलेट ब्राऊनीमध्ये साखर कमी प्रमाणात वापरलेली असते. ही ब्राऊनी आपल्या आरोग्याबरोबर त्वचेसाठी देखील फायदेशीर मानली जाते. ( डायबेटीजसाठी उत्तम फळ आहे पेरू; पण या आजारांत ठरू शकतो घातक, वाचा कधी खावा? ) केळ्याचा हलवा- केळ्यामध्ये भरपूर अॅन्टिऑक्सिडन्ट आणि पोषक घटक असतात. त्यामध्ये फायबर, पोट्याशियम आणि इतर व्हिटॅमिन्स देखील असतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 जास्त प्रमाणात असतं. याचा हलवा बनवून खाल्ल्याने आपल्याला गोड खाण्याचा आनंद मिळू शकतो. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम- आईस्क्रीम खाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम हा एक उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवून साखरेचा कमी वापर करून हेल्दी आईस्क्रीम खाऊ शकतो. स्ट्रॉबेरीमध्ये अॅन्टिऑक्सिडन्ट भरपूर प्रमाणामध्ये असतात. ( International Beer Day : जाणून घ्या बिअर पिण्याचे 10 फायदे ) नारळाची बर्फी - नारळाची बर्फी हा लोकॅलरी डाएटसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. यामध्ये ड्रायफ्रूट आणि ब्राऊन शुगर वापरल्यास कॅलरीज आणखीन कमी करता येऊ शकतात. ओट्स सफरचंद फिरणी – ओट्स फरचंद फिरणी घरच्या घरी तयार करता येते. अतिशय हेल्दी आणि आरोग्यदायी असते. ( मजबूत केस आणि नितळ त्वचेसाठी ‘हा’ पदार्थ वापरा; पाहा आश्चर्यकारक फायदे ) लोफॅट गाजर हलवा - गाजर हलवा सगळ्यांनाच खायला आवडतो यामध्ये लोफॅट दूध किंवा कंडेन्स्ड मिल्क वापरून बनवता येऊ शकतो. फ्रूट केक - फ्रूट केकमध्ये कमी साखर वापरून जास्तीत जास्त फळांचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे भरपूर फळं पोटात जातात. तिळाचे लाडू - तिळाचे लाडू करण्यासाठी गुळ तूप आणि ड्रायफ्रूटस वापरले जातात. तीळ खाणं आरोग्यासाठी आणि केसांसाठी देखील उत्तम आहे. यामुळे बरेच फायदे होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.