सोडा किंवा एनर्जी ड्रिंकमध्ये साखर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे कॅलरीज वाढतात. शिवाय बॉडी सेल्सचं वय वाढायला लागतं. त्यामुळे स्ट्रोक आणि डिमेन्शिया सारखे त्रास होऊ शकतात.
फिट रहायचं असेल तर, तिखट जेवण बंद करा. जास्त मसालेदार जेवण जेवायची सवय असेल तर, ती आरोग्याला घातक ठरू शकते.
यामुळे रक्तवाहिन्यांना सुज होऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्वचा निस्तेज होते आणि वय जास्त वाटायला लागतं.
मद्यपान करायच्या सवयीने शरिर डिहायड्रेट होऊ शकतं. त्यामुळे शरीरात पाणी कमी होतं. त्याचा परिणाम त्वचेवर होतो. प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करणाऱ्यांच्या चेहरा रुक्ष आणि निस्तेज दिसतो.
प्रमाणापेक्षा जास्त साखर खात असाल तर, त्यामुळे एजिंगचा त्रास होऊ शकतो. यामुळे डार्क सर्कल्स आणि रिंकल्स होतात.