नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : पहिल्यांदा पालक होणं हा सुखद अनुभव असतो. पण, बाळाच्या संगोपनाच्या (Parenting**)** बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे नवजात बाळाला (New Born Baby) काहीही झालं तरी काळजी (Tension) वाटायला लागते. शिंका (Sneezing)येणं अतिशय सामान्य गोष्ट आहे, पण पहिल्यांदाच पालक झालेल्यांसाठी नवजात बाळाचं शिंकणं बऱ्याचदा पालकांसाठी चिंतेचा विषय असतो. जेव्हा बाळाला शिंक येते तेव्हा आईवडिलांना वाटतं की त्याला सर्दी झाली आहे किंवा तब्येत खराब (Health Issue) झाली आहे. पण, आता टेन्शन(Tension) दूर करणाऱ्यासाठी ही माहिती उपयोगी आहे. **बाळाला शिंकण**ं कधी असतं सामान्य ? बाळाला मॉलिश करताना किंवा नाक साफ करताना, त्याला शिंक येऊ शकते आणि ही अगदी सामान्य गोष्ट आहे.स्तनपान करताना, बाळाच्या नाकाची एक बाजू आईच्या स्तनावर दाबली जाऊ शकते,ज्यामुळे बाळाला शिंकणे नॉर्मल आहे.बाळ जन्माल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात, त्याच्या तोंडातून जास्त लाळ वाहते, कधीकधी बाळ ते गिळतं. ही लाळ बाळाच्या श्वासोच्छवासाच्या मार्गात अडथळा झाला तर,बाळाला शिकं येऊ शकते. ( चांगलं आरोग्य हवं असेल तर या वेळी नका पिऊ पाणी; जास्त पाणीही ठरतं घातक ) कधीकधी नाक बंद झाल्यामुळे बाळाला शिंक येणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे.बऱ्याचदा धूळीचे लहान कण हवेच्या माध्यमातून बाळाच्या नाकात जातात त्यानेही बाळाला शिंक येऊ शकते. ( हवामान बदलाचा फटका, ‘हा’ मोठा देश जगाच्या नकाशावरून गायब होण्याची भीती! ) कधी असतं बाळाला शिंक येणं गंभीर**?** बाळाला शिंक येण्याबरोबर बराच वेळा खोकला येत असेल तर, ही काळजीची गोष्ट आहे.शिंकताना बाळाला श्वास घेण्यात अडचण येत असेल तर..बाळाला सतत किंवा अधून मधून शिंक येत राहिल्यास लक्ष द्यावं.शिंका आल्यामुळे बाळाने दूध पिणं थांबवलं तर,काळजी करायलाच हवी. बाळाला अनेक वेळा शिंका येत आहेत आणि त्यामुळे असक्तपणा आला असेल तर. ( IASसाठी सोडलं लाखोंचं पॅकेज; गुंजन सिंह यांनी घेतला गरीबांसाठी देश सेवेचा निर्णय ) बाळाला निओनेटल अॅब्स्टन्स सिंड्रोम असेल आणि त्याने अनेक वेळा शिंकत येत असेल तर, चिंतेची बाब आहे. बाळाला अनेक वेळा शिंक येण्यासोबत ताप आणि सर्दीही झाली आहे तर, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.