चॉकलेटमध्ये फॅट, कोको आणि कॅफीन जास्त असतं. त्यामुळे बियर बरोबर खाल्ल्याने जास्त नशा येते त्यामुळे तहानही खुप लागत राहते.
वाईन किंवा बियरबरोबर फ्रेन्च फ्राइज खाऊ नयेत. फ्रेन्च फ्राइजमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं जे वाईन किंवा बियरबरोबर पचवणं जड असतं त्यामुळे पोट खराब होतं. यातील सोडियममुळे शरीर डिहायड्रेट होऊ लागतं. त्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो.
मद्य घेताना त्याबरोबर बर्गर खाऊ नका बर्गर पचायला जड असतो. त्यामुळे लिव्हरवर प्रेशर येतं. शरीरात जास्त फॅट जमा होतो.
मद्यपान करताना संत्री सारखी आंबट फळं खाऊ नयेत. आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात अॅसिड असतं त्यामुळे पचनासंबंधीचे विकार होतात.
दारूबरोबर तिखट पदार्थ हे चुकीचं कॉम्बिनेशन आहे. तिखट पदार्थांमध्ये कॅप्सायसिन ज्यामुळे शरीरात उष्णता वाढते.