• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • मुलाच्या 16 वर्षीय मित्राच्या प्रेमात पडली 7 मुलांची आई; लग्न केल्यानंतर...

मुलाच्या 16 वर्षीय मित्राच्या प्रेमात पडली 7 मुलांची आई; लग्न केल्यानंतर...

या दोघांमध्ये तब्बल 29 वर्षांचं अंतर आहे.

या दोघांमध्ये तब्बल 29 वर्षांचं अंतर आहे.

कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांनी लग्न केलं आणि...

  • Share this:
ब्रिटन, 07 ऑगस्ट : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हे वाक्य आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलं असेल. हे वाक्य सिद्ध करणारी घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. एका 45 वर्षांच्या महिलेला आपल्या मुलाच्या मित्रावरच (45 year old woman marries son’s friend) प्रेम जडलं. एवढंच काय, तर या महिलेने या मुलाशी लग्नही केलं आणि आता दोघांचा राजा-राणीचा संसारही सुरू आहे. एकदम फिल्मी वाटणारी ही स्टोरी खरोखरच घडली आहे. इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स भागात राहणाऱ्या मॅरिलिन बटिगिग (Marilyn Buttigig) या महिलेने आपल्या मुलाचा मित्र (Woman fell in love with son’s best friend) विल्यम स्मिथशी (William Smith) लग्न केलं. विशेष म्हणजे विल्यम हा मॅरिलिनपेक्षा तब्बल 29 वर्षांनी लहान (Woman marries guy 29 years younger than her) आहे. 2006 मध्ये या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. मॅरिलिनचा मुलगा विल्यमचा मित्र होता. त्याच्यासोबत खेळण्यासाठी विल्यम त्यांच्या घरी आला होता. यानंतरही मॅरिलिनच्या मुलासोबत खेळण्यासाठी म्हणून विल्यम त्यांच्या घरी येत राहिला, आणि यातच मॅरिलिन आणि विल्यममध्ये जवळीक वाढली. त्यावेळी विल्यम हा अवघ्या 16 वर्षांचा होता.यानंतर केवळ तीनच वर्षांनी मॅरिलिन आणि विल्यमने लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - ऐकावे ते नवल! एकाचं वर्षात ही महिला झाली 2 वेळा गर्भवती; दिला 4 बाळांना जन्म या दोघांचंही कुटुंबीय आणि मित्र या लग्नाच्या विरोधात होते. मात्र कोणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी अखेर लग्न (Britain couple with big age gap) केलेच. लग्नानंतर बऱ्याच नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्यांच्याशी संबंध तोडले. पण एवढं सगळं होऊनही त्या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. या दोघांच्या लग्नापूर्वी मॅरिलिनला सात मुलं आहेत. मात्र, सर्व कुटुंबानेच मॅरिलिनशी बोलणं टाकलं. आता विल्यमचा मित्र असणारा मॅरिलिनचा मुलगा सोडून कोणीही तिच्याशी बोलत नाही. तर दुसरीकडे विल्यमच्या कुटुंबीयांनीही त्याच्याशी बोलणं टाकलं आहे. या दोघांच्या लग्नाला नुकतीच 12 वर्षे पूर्ण झाली. अजूनही या दोघांमध्ये तेवढंच प्रेम आहे जेवढं सुरुवातीला होतं. विल्यम म्हणतो, "मॅरिलिन आणि माझ्यात काहीतरी खास नातं आहे. ती तेव्हाही माझी ड्रीम वुमन होती, आणि आजही आहे.” मॅरिलिन म्हणते, की “लोकांचे टोमणे ऐकूनही आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही, कारण आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतो" हे वाचा -क्षणात गायब झाले 17 लाख फॉलोअर्स!आईच्या या कृतीमुळे 14 वर्षीय Influencer ला झटका विल्यम हा एक फिल्म प्रोड्यूसर आहे. हे दाम्पत्य आता आपल्या लव्हस्टोरीवर एक सिनेमा तयार करणार आहेत. यासाठी विल्यम क्राऊडफंडिंगद्वारे पैसे जमा करत आहे. आपली कथा आपल्या पद्धतीने पडद्यावर मांडल्यानंतर तरी किमान जास्त एज गॅप असणाऱ्या कपल्सकडे (Couples with big age gap) पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलेल, अशी त्यांना आशा आहे.
First published: