मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ज्योतिरादित्यांचा राजेशाही थाट! डोळे दिपवणारं वैभव, बड्या उद्योगपतींपेक्षा जास्त आहे संपत्ती

ज्योतिरादित्यांचा राजेशाही थाट! डोळे दिपवणारं वैभव, बड्या उद्योगपतींपेक्षा जास्त आहे संपत्ती

काँग्रेसला रामराम करून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपचा हात धरला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या निर्णयाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसला रामराम करून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपचा हात धरला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या निर्णयाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसला रामराम करून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपचा हात धरला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या निर्णयाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

  • Published by:  Suraj Yadav

भोपाळ, 11 मार्च : मध्य प्रदेशात काँग्रेसला रामराम करून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपचा हात धरला आहे. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या निर्णयाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजघराण्यातले असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. ग्वाल्हेरच्या शिंदे घरण्यातील असलेल्या ज्योतिरादित्य यांना राजकारणाशिवाय शूटिंग, क्रिकेट, तिरंदाजी आणि कार रेसिंगचीही आवड आहे.

ज्योतिरादित्य यांचा 12 डिसेंबर 1994 रोजी प्रियदर्शनी राजे यांच्याशी विवाह झाला. जगातील 50 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत प्रियदर्शनी यांनी स्थान  मिळवलं होतं. प्रियदर्शनी या बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील आहेत. त्यांना दोन अपत्ये आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी 1993 ला हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर स्टॅनफोर्ड ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पूर्ण केले. अमेरिकेत त्यांनी चार वर्षे कामही केलं आहे.

वडिलांच्या निधनानंतर राजकारणात सक्रिय

राजघराणं आणि राजकीय पार्श्वभूमी असली तरी वडिलांच्या निधनानंतरच ते राजकारणात सक्रिय झाले. 30 सप्टेंबर 2001 ला वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत जोतिरादित्य यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2004 च्या लोकसभेत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ज्योतिरादित्य यांनी केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

राजेशाही थाट

ज्योतिरादित्य हे राजघराण्यातील असल्यानं त्यांची जीनवशैलीही राजेशाही अशीच आहे. ज्योतिरादित्य राहतात त्या राजमहालात 400 खोल्या आहेत. 1874 मध्ये उभारण्यात आलेल्या या राजमहालाचे नाव जयविलास असं आहे. युरोपिअन शैलीत बांधण्यात आलेल्या या राजमहालातील 40 खोल्यांमध्ये म्युझिअम उभारण्यात आलं आहे.

जयविलास पॅलेस

जयविलास पॅलेसची भव्यता त्याच्या दरबार हॉलवरूनच दिसते. 100 फूट लांब, 50 फूट रुंदी आणि 41 फूट उंच आहे. या महालाच्या छतात 3500 किलो वजनाचे 2 झुमर लावले आहेत. इतकं वजन छताला पेलता येईल का हे पाहण्यासाठी छतावर हत्ती चढवण्यात आल्याचंही सांगितलं जातं. राजेशाही थाट असलेल्या राजमहालाचा डायनिंग हॉलही तितकाच प्रशस्त आहे. यात लक्ष वेधून घेते ती डायनिंग हॉलमधील चांदीची ट्रेन. या ट्रेनच्या मदतीनंच जेवण वाढलं जातं.

जोतिरादित्यांकडे 35.33 कोटींची संपत्ती

मध्य प्रदेशात असलेल्या ज्योतिरादित्य यांची महाराष्ट्रात श्रीगोंदा इथं 19 एकर आणि लिंबण इथं 53 एकर जमीन आहे. याशिवाय मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या जमीनी आहेत .

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना त्यांनी संपत्तीची माहिती दिली आहे. यात ज्योतिरादित्य यांच्या नावावर एकूण 35.33 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे. यासिवाय 1960 च्या मॉडेलची एकच  कार त्यांच्या नावावर असल्याचं म्हटलं आहे.

राजघराण्याची संपत्ती 350 कोटींपेक्षा जास्त

राजघराण्याची एकत्रित संपत्ती 350 कोटींपेक्षाही अधिक आहे. निवडणुक आयोगाला दिलेल्या माहितीत त्यांनी संपत्तीचे विवरण सादर केले होते. यात त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी राजे यांच्याकडे 8 लाख 66 हजार रुपये तर दोन्ही अपत्यांकडे मिळून 28 लाख रुपयांची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय घराण्याची इतर संपत्ती 300 कोटींच्या आसपास असल्याची माहिती दिली आहे.

हे वाचा : ‘या’ आहेत ज्योतिरादित्य यांच्या पत्नी, 50 सुंदर महिलांमध्ये झाला होता समावेश

First published:

Tags: Jyotiraditya Shinde