हेल्थ इंडेक्समध्ये इटली दुसऱ्या क्रमांकाचा हेल्दी देश आहे. इटलीतील लोकांची जीनवशैली हेल्दी मानली जाते. इथं Mediterranean diet ला प्राधान्य दिलं जातं, जे हृदयासाठी फायदेशीर असतं. मात्र इटलीमध्ये कोरोनाव्हायरसची 7,375 प्रकरणं आहेत आणि 366 मृत्यू झालेत. कोरोनाव्हायरसमुळे चीननंतर सर्वाधिक मृत्यू या देशात झालेत.
नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंड या देशातील लोकं हेल्दी आहेत कारण ते डोंगर चढतात. त्यांची घरं उंचावरच असतात, जिथं ते पायी चालत जातात. मात्र हेल्दी देशाप्रमाणे कोरोनाव्हायरसच्या संक्रमित देशांच्या यादीतही हा देश जपानच्या पाठोपाठ आहे. याठिकाणी कोरोनाव्हायरसचे 332 प्रकरणं आहेत, तर 2 मृत्यू झालेत.