मुंबई, 12 मार्च : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतचं तिचं नातं तर बी टाऊनमधला सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. या दोघांच्या वयात जवळपास 11 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं पण यासोबतच मलायका अनेकादा तिच्या ड्रेसिंग सेन्सवरुनही ट्रोल होते. आताही तिच्यासोबत असंच काहीसं झालं आहे. ज्यामुळे तिला पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती जिम आउटफिट्समध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हिडीओ जर्नालिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका जीममध्ये जाताना दिसत आहे. मात्र तिच्या जीम आउटफिट्सचा कलर तिच्या स्किन कलरशी एवढा मिळता जुळता आहे की त्यामुळे सर्वच संभ्रमात आहे. याच लुकवरुन मलायकाला सध्या जोरदार ट्रोल केलं जात आहे. शॉपिंगसाठी मार्केटमध्ये पोहोचल्या खासदार नुसरत जहाँ, ग्लॅमरस लुकवर चाहते घायाळ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वात वाईट जीम आउटफिट आहे. तर काही युजर्सनी मलायकाला निदान तुझं वय काय आहे हे बघून फॅशन कर असा सल्ला दिला आहे. काही युजर्सनी मलायकाची तुलना किम कर्दाशियनशी करत, तिला भारताची स्वस्तातली किम कर्दाशियन असं म्हटलं आहे. तर काही खरंच मलायकानं कपडे घातले आहेत का? असा प्रश्न केला आहे. अंकितानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक PHOTO, चाहत्यांना झाली सुशांतची आठवण
मलायकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहत आहे. मलायका नेहमीच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून अनेकदा ती तिचे योगा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. याशिवाय अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळेही ती खूप चर्चेत असते. हे दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वी दिलेल्या एक मुलाखतीत या दोघांनी या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. एक कॉल आणि अकाउंटमधून पैसे गायब, KYC च्या नावाखाली अभिनेत्रीची फसवणूक