जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’

सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’

सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’

आपण वापरत असलेल्या नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत हा व्हायरस पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 मार्च : आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी तुम्ही पुरेपूर काळजी घेत आहात. मात्र तरीही तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे. तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही कोरोनाव्हायरस असू शकतो. आपण वापरत असलेल्या नोटा म्हणजे पेपर मनीवर (Paper money) हा जीवघेणा व्हायरस असू शकतो आणि या नोटांमार्फत तो पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. त्यामुळे भारतात कॉन्टॅक्टलेस ट्रान्झक्शेनवर भर द्यावा, अशी सूचना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) केंद्र सरकारला केली आहे. संबंधित -  धक्कादायक! कोट्यवधी लोकांच्या जीवावर उठणार कोरोना, लाखो भारतीयांचा होणार मृत्यू कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनी (CAIT) केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा धोका पाहता करन्सी नोट्सऐवजी कॉन्टॅक्टलेस ट्रान्झेक्शन, डिजीटल ट्रान्झेक्शन वाढवण्यावर जोर देण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय प्लास्टिक नोट्सबाबतही विचार करण्यास सांगितलं आहे. CAIT ने अर्थमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये कोरोनाव्हायरसबाबतचे स्टडीज आणि मीडिया रिपोर्टचा हवाला दिला आहे. करन्सी नोट्सवर मायक्रो-ऑर्गेनिज्म असतात, ज्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. नोटांमार्फत कित्येक प्रकारचे संसर्ग पसरतात, याबाबत तज्ज्ञांनीही सावध केलं आहे. यामुळे युरिनरी, श्वसनाच्या समस्या, स्किन इन्फेक्शन यासारखे आजार पसरण्याचा धोका वाढतो. संबंधित -  ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, ‘कोरोना’पासून वाचण्यासाठी पाहा हा Video CAIT चे सेक्रेटरी जनरल प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं की, ‘ट्रेडिंग कम्युनिटीमध्येच करन्सीचा सर्वात जास्त वापर केला जातो. एखादी नोट एका हातातून दुसऱ्या हातात वारंवार ट्रान्सफर होत असते. यामुळे नोट दूषित होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. भारतात सर्वाधिक लोकं पैसे मोजताना तोंडात बोटं घालून थुंकीनं ओलं करून मोजतात. ज्यामुळे कोणताही व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो’ यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या देशांनी पॉलिमर नोटांचा वापर सुरू केला आहे, जेणेकरून व्हायरसचं संक्रमण जास्त होणार नाही. भारतानंही अशाच पॉलिमर नोटांसारखा पर्याय शोधावा, असंही CAIT ने केंद्र सरकारला सुचवलं आहे. संबंधित -  तुम्हीही होऊ शकता Coronavirus चे शिकार, असा करा स्वत:चा बचाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात