मुंबई, 10 मार्च : चीनमधून जगभर पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसची दहशत आता वाढतच चालली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे संशयित रुग्ण सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 1 मार्चला दुबईतून पुण्याला आलेल्या दोघांना कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यानंतर गेल्या दहा दिवसांत कोरोनाचे तीन रुग्ण वाढले. दरम्यानच्या काळात या रुग्णांचा ज्यांच्याशी संपर्क झाला त्यांनाही कोरोनाची भीती बळावली आहे. यामुळे याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. सध्या जगभरात कोरोनाचे 1 लाख 13 हजार रुग्ण आहेत. तसेच जवळपास 4 हजार जणांना यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. पहिल्यादा डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्याला तीन महिन्यांचा कालावधी झाला तरी अद्याप या व्हायरसला रोखण्यात यश आलेलं नाही. यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असून वेगवेगळे उपाय अनेक देशांनी केले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याची सूचनाही दिली आहे.
#coronavirusinindia :
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) March 10, 2020
Simple steps can help protect us and others from #COVID19.
Also, share the 24x7 Control Room Helpline number for support and technical assistance. #SwasthaBharat pic.twitter.com/SoDM4Qn7MV
कोरोनाची भीती न बाळगता त्याच्या लक्षणांची माहिती करून घेतली पाहिजे. लक्षणांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर विश्वास न ठेवता योग्य ती माहिती घ्या. कोरोना झालेल्या रुग्णामध्ये सरासरी 5 दिवसांत लक्षणे दिसत असल्याचं जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटलं आहे. कोरोना झालेल्या लोकांवर संशोधन करण्यात आल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काहींमध्ये कोरोनाची लक्षणे लवकर दिसतात तर काही लोकांमध्ये ही लक्षणे दिसण्यास उशीर होतो. कोरोनाचे निदान होण्यासाठी सध्या 14 दिवसांचा कालावधी लागत आहे. कोरोनाची लक्षणे : सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच कोरोनाची लक्षणे आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमण जलद होतं. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, अशक्तपणा ही कोरोनाची मुख्य लक्षणं आहेत. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनीही कोरोनाचा ताप आल्याचं तपासणीमधून समोर येतं. पहिल्या 14 दिवसांमध्ये तपासणी केली तर कोरोना असल्याचं कदाचित कळणार नाही पण 24 दिवसांमध्ये कोरोनाची टेस्ट पोझिटीव्ह येऊ शकते. कसा पसरतो कोरोना : कोरोना विषाणू प्राण्यापासून पसरला असला तर सध्याचा नोवल कोरोना कुठून पसरायला सुरुवात झाली हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे प्राण्यांपासून बाधा होईल असं नाही. शिंक, खोकला यामुळे हवेतून या विषाणूचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे. अशी घ्या काळजी : कोरोनामुळे ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. या संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं किंवा आपली काळजी आपण घेणं आवश्यक आहे. हात वारंवार धुवा. शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. कोरोना आणि मांसाहार यांचा थेट संबंध नसला तरीही अर्धवट शिजलेलं आणि कच्च मांस खाणं टाळा. फळे, भाज्या न धुता खाऊ नका. हे वाचा : कोरोनाची भीती; मुंबईच्या ओला ड्रायव्हरलाही संसर्ग, पुण्यात रुग्णांची संख्या 5 चीनसह इतर देशांमध्ये जिथं कोरोनाचा सर्वाधिक हाहाकार आहे त्या देशातून विषाणू पसरत आहेत. अशा देशांमधून तसेच कोरोना ग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना होईलच असे नाही मात्र योग्य तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेल्यांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अनेक देशांमधील आरोग्य संस्थांनी लोकांना परदेश प्रवासानंतर लोकांमध्ये न मिसळण्याचा सल्ला दिला आहे. हे वाचा : कर्नाटक, केरळात ‘कोरोना’चे आणखी रुग्ण, भारतात व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढला