Home /News /lifestyle /

Beauti Tips: पंचवीशीतील पोरासारखं तरूण दिसायचंय? फॉलो करा या 5 टिप्स

Beauti Tips: पंचवीशीतील पोरासारखं तरूण दिसायचंय? फॉलो करा या 5 टिप्स

Beauti Tips: पंचवीशीतील पोरासारखं तरूण दिसायचंय? फॉलो करा या 5 टिप्स

Beauti Tips: पंचवीशीतील पोरासारखं तरूण दिसायचंय? फॉलो करा या 5 टिप्स

Beauty Tips: अलीकडच्या काळातील धकाधकीची जीवनशैली, कामाचा ताण, चुकीचा आहार इत्यादींमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या सर्व गोष्टींचा परिणाम शरीरावर आणि चेहऱ्यावरही (Skin) दिसून येतो. ऐन तारुण्यात त्वचा निस्तेज होते.

  मुंबई, 17 जून : Beauti Tips: अलीकडच्या काळातील धकाधकीची जीवनशैली, कामाचा ताण, चुकीचा आहार इत्यादींमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या सर्व गोष्टींचा परिणाम शरीरावर आणि चेहऱ्यावरही (Skin) दिसून येतो. ऐन तारुण्यात त्वचा निस्तेज होते, केस पांढरे होतात याच गोष्टींमुळे अनेकजण तारूण्य हरवून बसतात आणि त्यांचे वय कमी असूनही ते जास्त वयाचे दिसू लागतात. परंतु तुम्ही काही मार्गांचा अवलंब करून वृद्धत्वाचा प्रभाव नियंत्रित करू शकता. 1. नियमित व्यायाम करा (Do Regular Exercise) तुमच्या दैनंदिन दिनचर्येत कोणत्याही प्रकारच्या व्यायामाचा समावेश करा. यामुळे तुम्ही वाढत्या वयातही स्वतःचा फिटनेस राखू शकता. धावणे, जॉगिंग, सायकलिंग, योगासने असे अनेक पर्याय आहेत. या सर्व क्रियांमुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होते. त्यामुळे शरीराची सर्व कार्ये सुरळीतपणे चालतात आणि चेहऱ्याची चमकही वाढते. त्यामुळे व्यायाम तुम्हाला तरुण ठेवण्याचे काम करतो.
   2.भरपूर पाणी प्या (Drink plenty of water) फक्त उन्हाळ्यातच शरीर हायड्रेटेड ठेवावं असं नाही, तर प्रत्येक ऋतूत शरीर हायड्रेट असणं गरजेचं आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने ड्रायनेस येत नाही. शरीरातील घाण लघवीद्वारे बाहेर पडत राहते. अन्नामध्ये असलेली पोषणद्रव्ये शोषण्यास मदत होते. याशिवाय पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला वाढत्या वयातही तरुण दिसायचे असेल तर त्यामुळे पाण्याचे महत्त्व समजून घ्या.
  3. पुरेशी झोप घ्या (Get enough Sleep) आपण जेव्हा झोप घेत असतो, तेव्हा शरीर आपली खराब त्वचा नीट करण्याचे काम करते, म्हणून 6 ते 7 तासांची झोप आवश्यक आहे असे म्हटले जाते. झोपेच्या वेळी त्वचा कोलेजन निर्मितीचे काम करते, जे त्वचेसाठी टॉनिकसारखे असते. यामुळे वाढत्या वयाबरोबर सुरकुत्या येण्याची प्रक्रिया मंदावते. याचा अर्थ तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसू शकता. एवढेच नाही तर पुरेशी झोप घेतल्याने डोळ्यांची सूज, थकवा आणि इतर अनेक समस्या दूर होतात.
  4. सकस आहार घ्या (Eat a healthy diet) जास्त काळ तंदुरुस्त आणि तरुण दिसण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. फळे, ज्यूस, हिरव्या भाज्या, कडधान्ये, बीन्स, स्प्राउट्स, सीड्स इत्यादी गोष्टी तुमच्या आहाराचा भाग बनवा. तळलेले पदार्थ, जंक फूड, साखरयुक्त पदार्थ आणि भरपूर मीठ असलेल्या गोष्टी खाणे टाळा. अन्नातील साखर आणि मीठ यांचे प्रमाण नियंत्रित करून तुम्ही वयाचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी करू शकता.
  5. साखर आणि मीठाचे सेवण कमी करा (Reduce sugar and salt intake) आपल्या आहारातील साखर आणि मीठाचे प्रमाण शक्य तितके कमी करा. या दोन्ही गोष्टी वय झपाट्याने वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांना टाळणेच योग्य ठरेल.
  Published by:user_123
  First published:

  Tags: Beauty tips, Drink water, Health Tips, Types of exercise

  पुढील बातम्या