जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips: दातांमधील पोकळी त्रास देतेय? मग करा 'हे' घरगुती उपाय

Health Tips: दातांमधील पोकळी त्रास देतेय? मग करा 'हे' घरगुती उपाय

दातांमध्ये संवेदनशीलता - 
दातांमध्ये संवेदनशीलता - 
दातांच्या किरकोळ समस्यांकडेही दुर्लक्ष करू नये आणि शक्य तितक्या लवकर दंतवैद्याकडे जावे. दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणं आणि दातांमधील संवेदनशीलता याकडे दुर्लक्ष करू नये. तरुणांव्यतिरिक्त लहान मुलांमध्येही दातांच्या समस्या आढळतात. ज्या बाळाला दुधाची बाटली दिली जाते, त्यांचे पुढचे चार दुधाचे दात अनेकदा लवकर पडतात.

दातांमध्ये संवेदनशीलता - दातांमध्ये संवेदनशीलता - दातांच्या किरकोळ समस्यांकडेही दुर्लक्ष करू नये आणि शक्य तितक्या लवकर दंतवैद्याकडे जावे. दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणं आणि दातांमधील संवेदनशीलता याकडे दुर्लक्ष करू नये. तरुणांव्यतिरिक्त लहान मुलांमध्येही दातांच्या समस्या आढळतात. ज्या बाळाला दुधाची बाटली दिली जाते, त्यांचे पुढचे चार दुधाचे दात अनेकदा लवकर पडतात.

दातांची पोकळी कमी करण्यासाठी किंवा त्यावर होणारं जंतूचं आक्रमण कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 जून : अनेक वेगळ्या प्रकारच्या (Health Update) जिवाणूंच्या संक्रमणामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. या जिवांणूनी तोंडात संक्रमण केल्यावर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खराब जिवाणू तोंडात अॅसिड तयार करतात त्यामुळे दातांमध्ये लहान छिद्र होऊ लागतात. याला आपण पोकळी किंवा कॅविटी म्हणतो. मात्र ही दातांची पोकळी (Tooth Cavity) कमी करण्यासाठी किंवा त्यावर होणारं जंतूचं आक्रमण कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय (Home Remedy) करु शकता. यावर तुम्ही खालीलप्रमाणे घरगुती उपाय करु शकता.  हळद  हळद पावडर बोाटांच्या सहाय्यानं हिरड्यांवर चोळा.  10-15 मिनिटांनंतर थंड पाण्यानं ते स्वच्छ धुवून काढा. याने थोडा फरक जाणवेल. लवंग  रुईचा तुकडा घ्या. या तुकड्यावर लवंगाचे तेल टाका आणि दातांच्या पोकळीत दोन तीन थेंब घाला. सहसा रात्री हा उपाय करा जेणेकरुन रात्रभर त्याचा फायदा होईल. सकाळी उठल्यावर दात स्वच्छ पाण्यानं धुवा. खोबरे तेल  एक चमचा तेल तोंडात टाका. तेल तोंडात व्यवस्थितरित्या फिरवा. 5 मिनिट तोंडात व्यवस्थित फिरवल्यानंतर ते थूंकून टाका आणि काही कालावधीनंतर ब्रश करा आणि तोंड स्वच्छ धुवा. हे ही वाचा -  Asthma : दम्याचा अटॅक टाळण्यासाठी रोजच्या आयुष्यात स्वत:ची अशी घ्या काळजी कडुलिंब  कडुलिंबाची छोटी काडी घ्या. त्या काडीच्या पुढच्या भागाला चघळून मऊ करा. त्या काडीनं 10 मिनिट दात व्यवस्थित घासा जेणेकरुन दातांमधील अडकलेली घाण स्वच्छ होईल. त्यानंतर थंड पाण्यानं दात स्वच्छ धुवा. हे ही वाचा -  फायबर आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी जास्त खाणं टाळा; त्याचे हे साईड इफेक्ट होऊ लागतात लसूण लसणाची एक छोटी पाकळी घ्या आणि ती चघळा. किंवा लसणाची पेस्ट तयार करुनही दातांवर लावू शकता. 10 मिनिटांनंतर ब्रश करा जेणेकरुन दुर्गंध निघून जाईल आणि दात स्वच्छ होतील. दरम्यान, सगळ्यांनाच आपले दात स्वच्छ आणि निरोगी असावे, असं वाटत असतं. मात्र काही खराब जंतूमुळे त्यांच्यावर परिणाम होतो आणि ते खराब होऊ लागतात. यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. ज्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात आराम मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात