मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

2 मिनिटात लागेल गाढ झोप; वापरा हे 4-7-8 मिलिट्री टेक्निक

2 मिनिटात लागेल गाढ झोप; वापरा हे 4-7-8 मिलिट्री टेक्निक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

बिछान्यावर पडल्यावर लवकर झोप येत नसेल, चांगली झोप लागत नसेल तर सायंटिफिक स्लीपिंग टेक्निक (Scientific Sleeping Technique) वापरता येतात.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 10  जून : बऱ्याच लोकांना अंथरूणात पडल्यानंतरही लवकर झोप (Sleeping disorder) लागत नाही. बराच वेळ तळमळत राहून सुद्धा झोप न आल्यामुळे सकाळी उठताना देखील त्रास होतो. झोप अपुरी होते. दिवसभर निरुत्साह वाटतो आणि आळस वाढत जातो. काहींना रात्री अचानक झोपमोड होऊन जाग येते आणि मग पुन्हा झोप लागत नाही. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो आणि काम करताना उत्साह वाटत नाही. झोप पूर्ण झाली नाही तर अनेक आजार देखील व्हायला लागतात. शरीराला चांगल्या पोषणाबरोबर पुरेशी झोप देखील आवश्यक आहे.

नोकरी करणार्‍या लोकांना तर झोप पूर्ण न होण्यामुळे खूप त्रास होतो. कारण थकव्यामुळे त्यांना वेगाना काम करता येत नाही. याने शरीर आणि मनावरही परिणाम (Effect on Body & Mind) होतो.

लगेच झोप न येण्याचा त्रास असणाऱ्यांसाठी अमेरिकन मिलिट्रीने (American Military for sleep wellness) एक उपाय शोधून काढला होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये  (World War II) सैनिकांसाठी हा उपाय शोधण्यात आलेला होता. या उपायाने तात्काळ झोप लागू शकते. यासाठी अमेरिकने मानसोपचार तज्ज्ञ आणि क्रीडा प्रशिक्षकांची मदत घेतली होती.

(सकाळी नाही संध्याकाळी करा व्यायाम; गंभीर आजार होतील बरे)

लागणारा वेळ

या टेक्निकने (Technique) झोपण्याची सवय व्हायला 6 आठवड्यांचा काळ लागतो. याचा प्रयोग वैमानिकांवर करण्यात आला होता. त्याचा 96% परिणाम दिसला. पायलट ही टेक्निक शिकल्यानंतर केवळ 2 मिनिटांमध्ये झोपायला लागले. एखाद्या जागेवर बसून सुद्धा त्यांना झोप यायला लागली.

स्लीपिंग टेक्निक

आधी तुमचा पूर्ण चेहरा रिलॅक्स करा. त्यावर कोणतेही हावभाव नसावेत.

आपले खांदे थोडेसे हलके सोडा. हात बाजूला ठेवा.

श्वासोच्छवास करत आपली छाती रिलॅक्स करा.

आपले पाय, मांड्या, स्नायू देखील रिलॅक्स करा.

10 सेकंदांसाठी आपला मेंदूही शांत करा.

(या वाईट सवयी लगेच सोडा; हाडं होतील कमजोर आणि मोडतीलही लवकर)

मेंदू शांत होत नसेल तर काय कराल?

प्रयत्न करून देखील काही जणांना मेंदूमधील विचार काढता येत नाहीत. त्यामुळे मेंदू शांत होत नाही. अशा वेळेस काहीच न करता शांत बसा आणि ‘डोंट थिंक’ (Don’t Think) हा शब्द मेंदूला पटवून देण्याचा प्रयत्न करा. जोरात बोलणं शक्य नसेल तेव्हा केवळ मनामध्ये हा शब्द आठवत रहा. कोणतेही विचार मनात नसावेत हे मेंदूला पटवून द्या.

मिलिटरीची 4-7-8 टेक्निक वापरा

मेंदूला कितीही सांगून मेंदू शांत होत नसेल तर मिलिटरी टेक्निक 4-7-8 वापरू शकता श्वासोच्छवासवर नियंत्रण करण्याची ही एक पद्धत आहे.

आपल्या जिभेचं टोक आपल्यावरच्या दातांच्या मागे ठेवा.

तोंडाने जोरात श्वास बाहेर फेका.

मग नाकाने श्वास आत घ्या आणि मनामध्ये चारपर्यंत अंक मोजा.

श्वास धरून ठेवा सातपर्यंत अंक म्हणा.

आता श्वास बाहेर सोडताना आठपर्यंत अंक मोजा.

पद्धतीने तीन वेळा श्वासोच्छवास करा.

('हा' मासा खाल्ल्याने हेल्दी हार्टसह होतील अनेक फायदे)

लक्षात ठेवा ही क्रिया करताना आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासोच्छवासावर असायला पाहिजे. एंझायटीचा (Anxiety) त्रास असलेल्यांना देखील अशाप्रकारे श्वासोच्छवास करण्याने फायदा मिळू शकतो. पण, तरीही फरक पडत नसेल तर, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सायंटिफिक स्लीपिंग टक्निक कोणी शोधली?

या पद्धतीचा शोध बड विंटर यांनी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने लावला होता. ते फुटबॉल कोच होते. त्यानी संशोधन करून खेळाडूंना तणावपूर्ण वातावरणात चांगला खेळ करण्याची पद्धत शिकवलेली होती. नंतर त्यांनी मिलेटरी बरोबर काम करायला सुरुवात केली नंतर त्यांनी पायलटला देखील हिच स्लीपिंग टेक्निक (Scientific Sleeping Technique) सैनिकांना शिकवली. या टेक्निकचा उल्लेख ‘रिलॅक्स अँड विन चॅम्पियन परफॉर्मन्स’ या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. तुम्ही कॉफी प्यायला नंतर, कितीही गोंगाट असेल किंवा अगदी बंदुकीचा आवाज झाला तरी शांतपणे झोपू शकता अशी या पद्धतीची खासियत आहे.

First published:

Tags: Health Tips, Sleep, Sleep benefits, United States of America