Home /News /lifestyle /

Heart Attack : व्यायाम हवाच पण किती वेळ? जास्त व्यायाम केल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Heart Attack : व्यायाम हवाच पण किती वेळ? जास्त व्यायाम केल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका

आपल्याला आपल्या निरोगी शरीराची काळजी (Physical Activity) घेत असताना व्यायामाला आपल्या आयुष्याचा भाग बनवावा लागत आहे. परंतु अनेकदा लठ्ठपणामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तींना सातत्याने व्यायाम करण्याची सवय नसते.

    दिल्ली, 22 सप्टेंबर : बदलती जीवनशैली आणि आपल्या आहारातील असंतुलनामुळे आपल्याला सातत्याने व्यायाम (morning walk Exercise) करत राहणे गरजेचे बनले आहे. हल्लीचे धावपळीचे आयूष्य बघता आपल्याला आपला फिटनेस (Side Effects of Exercise)राखण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्याचबरोबर आपल्या आहारात फॅटयूक्त पदार्थ खाणेही टाळावे लागत आहे. त्यामुळे आता आपल्याला आपल्या निरोगी शरीराची काळजी (Physical Activity) घेत असताना व्यायामाला आपल्या आयुष्याचा भाग बनवावा लागत आहे. परंतु अनेकदा लठ्ठपणामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तींना सातत्याने व्यायाम करण्याची सवय नसते. अशावेळी ते व्यायामाची सुरूवातच अतिरिक्त व्यायामाने (Extra Exercise Infection) करतात. कारण दररोज सकाळी व्यायाम करण्यासाठी आपल्याला त्याची सवय असावी लागते. आणि त्यात व्यायामाची सवय नसलेल्या लोकांना सतत व्यायाम करणे कठीण जाते, त्याचबरोबर त्यांना सतत व्यायामाची सवय नसल्याने ते एकदाच जास्त वेळ व्यायाम करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु अशा पद्धतीने जास्त वेळ व्यायाम करणे आपल्या आरोग्याला घातक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याचीही शक्यता असल्याने आता व्यायाम करताना आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेत व्यायाम करावा लागणार आहे. आपके हसीं पैर... पावसाळ्यात काळजी घेतली नाहीत तर असतो Infection चा धोका दैनिक जागरणमध्ये छापून आलेल्या एका बातमीनुसार जास्त वेळ व्यायाम करणे हे आपल्या शरीराच्या धमन्यांमधील रक्तपुरवठा थांववू शकतो. त्याचबरोबर सतत आपल्या शरीरात अवयवांवर पडणाऱ्या दबावामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आता व्यायाम करताना आपल्याला एक विशिष्ट वेळ आणि काळ ठरवून घ्यावा लागणार आहे. दक्षिण कोरियातील सुंगक्यूंकवान यूनिवर्सिटी ऑफ मेडिसिन (Sungkyunkwan University of Medicine) आणि अमेरिकेतील मेरीलँडच्या जॉन्स हापकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (Johns Hopkins Bloomberg School of Public Health) ने केलेल्या एका संशोधनानुसार जास्त वेळ आपली बॉडी ही एखाद्या कामात कार्यरत ठेवल्यामुळे आपल्या शरीरातील धमन्यांचे गोठणे आणि रक्ताच्या गाठी तयार व्हायला लागतात. रात्री झोप येत नाही? 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश आणि घ्या निवांत झोप! त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकचा धोका संभवतो. या संशोधनात हा धोका टाळण्यासाठी आपल्याला प्रतिआठवडा 150 ते 300 मिनीटं जोरदार आणि 75-150 मिनीटं मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण व्यायाम करत असतावा आपल्या शरीरातील कॅल्शियमच्या प्रमाणावरही लक्ष ठेवायला हवे. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Health Tips, Heart Attack, Side effects

    पुढील बातम्या