मुंबई, 28 जानेवारी : शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट 'पठाण' अखेर रिलीज झाला आहे. काही ठिकाणी विरोध होत असला तरी 'पठाण' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पठाणचे चाहते सगळीकडे उत्सव असल्यासारखं सेलिब्रेशन करत आहेत. बॉलीवूडचे अनेक कलाकार देखील शाहरुखच्या पठाणचं तोंडभरून कौतुक करत आहेत. या सगळ्यात मात्र चर्चा होतेय ती उर्फी जावेदच्या वक्तव्याची. ती सध्या कायम चर्चेत आहे. आता मात्र तिने हद्दच केली आहे. उर्फी जावेदने तर चक्क शाहरुख खानलाच लग्नासाठी विचारणा केली आहे. काय म्हणाली ती नक्की पाहा.
उर्फी जावेद नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. या दरम्यान, पापाराझींनी तिला पठाण संबंधीत काही प्रश्न विचारले आणि त्यासोबतच चित्रपटाला बॉयकॉट करत आहेत त्या लोकांना काय बोलणार? असं देखील विचारलं. यावर उत्तर देत उर्फी म्हणाली, 'मला बॅन करा, पण शाहरुख खानचे चित्रपट पाहा.' त्यानंतर शाहरुख खानसाठी काय सांगशील असं विचारता उत्तर देत उर्फी म्हणाली, 'शाहरुख खान माझं तुझ्यावर प्रेम आहे. कृपया मला तुझी दुसरी पत्नी बनव.' आता उर्फीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी तिच्या या विधानावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा - Shahrukh Khan: 'पठाण' च्या अभूतपूर्व यशानंतर आता टायगर 3 साठी सज्ज झाला किंग खान; असा असेल लूक
शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. YRF Spy Universe चा हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खानने पठाण नावाच्या रॉ एजंटची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर जॉन अब्राहम खलनायक बनला आहे. विशेष म्हणजे सलमान खानने शाहरुखच्या पठाण या चित्रपटातही कॅमिओ केला होता.
View this post on Instagram
शाहरुख खान चार वर्षांनंतर 'पठाण'मधून मोठ्या पडद्यावर परतला आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५५ कोटींची कमाई करून इतिहास रचला. या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने अवघ्या तीन दिवसांत वर्ल्डवाईड 220 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी भारतात 34. 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाने भारतात अवघ्या तीन दिवसांत एकूण 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पठाण चित्रपट शंभर पेक्षा अधिक देशांमध्ये आणि 2500 पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज करण्यात आला आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट आणखी काय कमाल करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दररोज चित्रपटाची कमाई झपाट्याने वाढत आहे. 'पठाण'नंतर आता शाहरुख खान 1 फेब्रुवारीपासून 'जवान'च्या शूटिंगला सुरुवात करणार असून, ते पुढील 6 दिवस सुरू राहणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुख अॅक्शन सीन शूट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Shah Rukh Khan, Urfi Javed