मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Besharam Rang Controversy: कोणी घालायला लावली दीपिकाला भगव्या रंगाची बिकिनी? समोर आलं नाव

Besharam Rang Controversy: कोणी घालायला लावली दीपिकाला भगव्या रंगाची बिकिनी? समोर आलं नाव

 दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण

'बेशरम रंग' गाण्यात दीपिकानं घातलेल्या बिकिनीवरून आक्षेप घेण्यात आला आहे. आता दीपिकाच्या त्या भगव्या रंगाच्या बिकीनीच्या डिझायनरचं नाव समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 डिसेंबर :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख आणि दीपिका यांचा ‘पठाण’ हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याआधीचित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे पहिले गाणे रिलीज झाले आहे.  या गाण्यात दीपिका आणि शाहरुख यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. दीपिकाच्या बोल्डनेसनं सर्वांना खिळवून ठेवलं आहे. गाण्यात दीपिकानं घातलेल्या बिकिनीवरून आक्षेप घेण्यात आला आहे. या गाण्याने सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. आता दीपिकाच्या त्या भगव्या रंगाच्या बिकीनीच्या डिझायनरचं नाव समोर आलं आहे. या ड्रेसवरून वाद झाल्यांनंतर पहिल्यांदाच या स्टाईलिस्टची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दीपिका पादुकोणच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी पठाणमध्ये तिनं सर्वाधिक बोल्ड सीन्स दिल्याचं म्हटलं जात आहे. दीपिकाला तिच्या बोल्ड सीन्स मुळे ट्रोल केलं जात असताना आता तिच्या बिकिनीच्या रंगावरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. बेशरम रंग गाण्यात दीपिकानं भगल्या रंगाचा बिकिनी ड्रेस घातला आहे. पठाण सिनेमात भगव्या रंगाचा झालेला अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही, असं प्रेक्षक म्हणत आहेत.
हेही वाचा – ‘भगवे कपडे घातलेल्या स्वामींनी मुलींवर बलात्कार केलेला चालतो, पण…’; प्रकाश राजच्या ट्विटने वाद तापला!
पण ‘बेशरम रंग’ मध्ये दीपिका पदुकोणच्या या बिकिनीचा रंग कोणी ठरवला त्या डिझायनरचं नाव समोर आलं आहे.   देशातील सर्वात  टॉप स्टायलिस्ट शालीन नाथानी यांनी या गाण्यासाठी दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचे पोशाख तयार केले आहेत. इंडस्ट्रीतील स्टार्सना वेगळा लूक देण्यासाठी ती ओळखली जाते. आता या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर शालीन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.


शालीन म्हणते की, ‘सिद्धार्थ आनंदने मला गाण्याचा संदर्भ सांगितला होता. ते कोणत्या पार्श्वभूमीवर घडतंय,स्टोरीशी त्याचं कनेक्शन काय आहे याचा अंदाज त्यानं मला दिला होता. सिनेमात ‘बेशरम रंग’ गाण्याचं महत्त्व देखील त्यानं सांगितलं होतं. त्यामुळे दीपिकाला एकदम बेफिकीर आणि बिनधास्त अंदाजात मला दाखवायचं होतं. दिग्दर्शकाची सुद्धा डिमांड होती की या गाण्यात शाहरुख आणि दीपिका असे दिसले पाहिजेत की त्यांना आधी कुणीच तसं पाहिलं नसेल.’ म्हणून शालीनने दीपिका आणि शाहरुखसाठी हा खास लुक तयार केला आहे.

शालीनने पुढे सांगितले की, तिला या गाण्यात मनापासून खूप वेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. ती म्हणाली की, ‘माझी इच्छा होती की मी या गाण्याला माझ्या आऊटफिटच्या माध्यमातून असं सादर करेन की आधी कुणीच तसं पाहिलं नसेल. मला दोन्ही स्टार्सचे आऊटफिट एकदम वेगळे हवे होते. दीपिकानं ज्या पद्धतीचे स्वीमूट घाटले आहेत,त्यासाठी जे रंग वापरलेत ते खूपच वेगळे आहेत. शाहरुखला देखील काही अॅक्सेसरीज घालायला लावून कूल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणं ट्रोल करत असले तरी अनेकांच्या मनात हे गाणं बसलं आहे.’

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Deepika padukone, Shahrukh khan